इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मार्केट्स रेग्युलेटरी सेबी (SEBI) ने एम्परिक ट्रेड आणि त्याचे मालक नीरज ठाकूर यांना परवानगीशिवाय सल्लागार सेवा पुरवल्याबद्दल सिक्युरिटीज मार्केटमधून बंदी घातली आहे. या प्रकरणी सेबीने त्यांना सप्टेंबर २०२१ मध्ये कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सेबीला या तपासणीत असे आढळले की एम्परिक ट्रेड आणि नीरज ठाकूर नोंदणीचे प्रमाणपत्र न घेता गुंतवणूक सल्लागार सेवा देत आहेत.
सेबीने आपल्या एका आदेशात म्हटले आहे की एम्परिक ट्रेडने जानेवारी-जुलै २०१९ दरम्यान ८३.७० लाख रुपये उभे केले होते. गुंतवणूक सल्लागार उपक्रमांसाठी शुल्क म्हणून घेतलेली ही रक्कम तीन महिन्यांत गुंतवणूकदारांना परत करण्याचे आदेशही सेबीने दिले आहेत. यासोबतच सेबीने गुंतवणूकदारांचे पैसे परत केल्यानंतर कंपनीला सिक्युरिटीज मार्केटमध्ये भाग घेण्यास सहा महिन्यांसाठी बंदी घातली.
दरम्यान, एका वेगळ्या आदेशात, SEBI ने Omnitech Infosolutions Ltd या कंपनीलाही दंड केला आहे. कंपनीने सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ७ संस्थांना एकूण २८ लाख रुपयांचा दंड ठोठावला. Omintech Infos Ltd (OIL) चे प्रवर्तक आणि त्यांच्या सहयोगींनी केलेल्या शेअर्समध्ये हेराफेरी केल्याचा आरोप सेबीला मिळाल्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे.
Sebi Order Fine Ban 6 Months Private Company