मुंबई – सध्याच्या काळात महागाईने कळस गाठला आहे. त्यामुळेच अन्नधान्याच्या वाढत्या किंमती तथा महागाईला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने फ्युचर्स ट्रेडिंगवर (वायदा बाजार) बंदी घातली आहे. खजूर, मूग, गहू यासह पाच वस्तूंचे वायदे व्यवहार एका वर्षासाठी स्थगित तथा निलंबित करण्याचा निर्णय बाजार नियामक सेबीने घेतला आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या अधिसूचनेनुसार, 2003 मध्ये या खाद्य उत्पादनांमध्ये फ्युचर्स ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर प्रथमच, त्यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेषतः किरकोळ बाजारातील खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. धान म्हणजे तांदूळ, गहू, सोयाबीन आणि क्रूड पाम तेल आणि मूग यांच्या फ्युचर्स ट्रेडिंगवर एक वर्षासाठी प्रतिबंध असेल. नवीन निर्णयानंतर यात एकूण नऊ उत्पादने असतील.
या वर्षाच्या सुरुवातीलाही केंद्र सरकारने हरभरा आणि मोहरीच्या वायदे व्यवहारावर बंदी घातली होती. या निर्णयानंतर, नॅशनल कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंजने सांगितले की, पुढील आदेश येईपर्यंत या वस्तूंमध्ये कोणतेही नवीन करार जारी केले जाणार नाहीत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरील व्यापार देखील प्रतिबंधित असेल. या निर्णयामुळे अन्नधान्य महागाई कमी होऊ शकते. याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिटेल रिसर्चचे प्रमुख दीपक जसानी म्हणाले, देशांतर्गत वस्तूंच्या व्यापारात घट आणि आयात वाढल्यामुळे आगामी काळात अन्नधान्य महागाई कमी होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई 4.91 टक्के आणि घाऊक महागाई 14.23 टक्क्यांवर पोहोचली होती.
खाद्यतेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर म्हणाले की, सध्या मोठे सट्टेबाज फ्युचर्स ट्रेडिंगद्वारे जीवनावश्यक वस्तूंवर नियंत्रण ठेवतात. अन्नधान्याच्या वाढत्या महागाईमुळे त्यांचे वायदे व्यवहार बंद करण्याची मागणी होत होती. परंतु अशी बंदी लादणे हे सरकारचे मागासलेले पाऊल आहे. याचा कृषी कमोडिटी मार्केटवर नकारात्मक परिणाम होईल आणि बाजारातील सहभागींचा आत्मविश्वासही कमी होईल, असे ओरिगो कमोडिटीजचे उपाध्यक्ष, के.व्ही. सिंग यांनी सांगितले. तर सेबीच्या बंदीनंतर कमोडिटी एक्स्चेंजवर सोयाबीन, खजूर, मोहरीची खरेदी-विक्री होणार नाही आणि या वस्तू बाजारात येतील. त्यामुळे तेलबिया स्वस्त होतील, असे खाद्य तेल संघटनेचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी सांगितले.