मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीद्वारे देशातील काही मोठ्या कंपन्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तळवलकर हेल्थ क्लबसह सात जणांचा समावेश असल्याची माहिती आहे.
भारतातील सिक्युरिटीज, शेअर मार्केटवर देखरेख ठेवण्यासाठी ही नियामक संस्था आहे. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि सिक्युरिटीज मार्केटच्या विकासास चालना देणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. सोप्या शब्दांत, सेबी ही एक सरकारी संस्था आहे जी भारतातील सिक्युरिटीज बाजाराचे नियमन करते. बाजारपेठेतील पारदर्शकता सुनिश्चित करणे, गुंतवणूकदारांना फसव्या कार्यांपासून संरक्षण करणे आणि बाजाराच्या वाढीस प्रोत्साहन देणे हे सेबी त्याची प्राथमिक उद्दिष्ट आहे. अशा या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेद्वारे कंपन्या आणि ७ व्यक्तींवर २.४६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दोन्ही कंपन्यांच्या प्रवर्तकांचाही या व्यक्तींमध्ये समावेश आहे. तसेच नियामकानं गिरीश तळवकर, प्रशांत तळवकर, मधुकर तळवकर, विनायक गावंडे, अनंत गावंडे, हर्षा भटकळ आणि गिरीश नायक यांना बाजारातून वेगवेगळ्या कालावधीसाठी बंदी घातली आहे. तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेड आणि तळवलकर्स हेल्थक्लब्स लि. या दोन कंपन्यांवर सेबीनं कारवाई केली आहे.
गिरीश तळवकर, प्रशांत तळवकर, मधुकर तळवकर, विनायक गावंडे, अनंत गावंडे, हर्षा -भटकळ हे या दोन्ही कंपन्यांचे प्रवर्तक आहेत. या सातही जणांना १८ महिन्यांसाठी मार्केटमधून बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय कोणत्याही लिस्टेड कंपनीशी असोसिएटेड होण्यावरही मनाई करण्यात आलीये. सेबीकडे ऑगस्ट-ऑक्टोबर २०१९ दरम्यान यांच्याविरुद्ध अनेक वेळा तक्रारी आल्या होत्या.
१२ लाखांचा दंड
फ्रॉड अँड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसमुळे बाजार नियामकानं त्यांच्यावर ही बंदी घातली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यामुळं सेबीनं गिरीश तळवकर, प्रशांत तळवकर, अनंत गावंडे आणि हर्षा भटकळ यांना प्रत्येकी ३६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. विनायक गावंडे आणि मुधकर तळवकर यांना प्रत्येकी २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गिरीश नायक यांना १८ लाखांचा दंड तर तळवलकर्स हेल्थक्लब्स लिमिटेडला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय.
SEBI Action Talwalkar Fitness Crore Fine Finance