अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगावच्या गिरणा पुलावरून बुधवारी गिरणा नदीत किल्ला परिसरात राहणाऱ्या नईम मोहम्मद अमीन या २३ वर्षीय तरुणाने उडी मारली होती. मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने तो पुरात वाहून गेला. आज सकाळपासून मालेगाव महापालिकेच्या अग्निशामक दलातील पट्टीचे पोहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.