शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मानवी हस्तक्षेपामुळे समुद्राचा तयार झाला चक्क वाळवंट; कुठे आणि कसा? घ्या जाणून सविस्तर..

एप्रिल 4, 2023 | 9:43 pm
in इतर
0
Fd7gXKCWAAsIM2K

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– आपलं पर्यावरण –
वाळवंट

माणसाला पाण्याइतकेच आकर्षण माती, रेतीचेही असते. नदी, तलाव, समुद्राभोवती जमणारी पर्यटकांची गर्दी, वाळवंटातही तेवढीच असते. अथांग पसरलेल्या समुद्रासारखंच वाळवंटाचही आहे. दूर-दूरपर्यंत बघावं तिथवर रेतीच रेती… मानवी समुहाला बघण्यापुरता, फारच फार काही काळ वावरण्यापुरता आवडणारा हा वाळवंट, एरवी जगण्यासाठी जिकिरीचा. झाडांची वानवा. पाणी नाही. पाऊस अभावानेच पडतो. मानवी अस्तित्व धोक्यात आलेले. अन्य प्राणीमात्रांनाही जगणे कठीण होईल असे वातावरण, कोरडे हवामान, कडक उन्ह…हे आणि असेच वर्णन करता येईल वाळवंटाचे.

Dr Pravin Mahajan
डॉ. प्रवीण महाजन
जल अभ्यासक
मोबाईल – 9822380111

जमिनीचा असा भाग जिथे मानवी, प्राणी-पक्षांचे अथवा झाडांचे अस्तित्व जवळपास संपलेले आहे, झाडं-झुडपं नसल्याने सूर्यकिरणे थेट जमिनीवर, तिच्या संरचनेवर आघात करतात, असा हा भू-प्रदेश. वाळवंट निर्माण होण्याची प्रक्रिया अक्षरशः लाखो वर्षांच्या कालावधीची मानली जाते. कोरड्या वातावरणामुळे या भागात पाण्याच्या बाष्पीभवनाच्या परिणामस्वरूप पडणाऱ्या पावसाचे, बर्फाचे प्रमाण जवळपास नसल्यागत असते. त्यामुळे तापमान अधिक असते.

पॄथ्वीवरील एक तॄतिआंश भाग पूर्णपणे कोरडा अथवा मध्यम कोरड्या हवामानाचा असतो. पॄथ्वीच्या आसाभोवतीच्या प्रदेशात असे वातावरण प्रामुख्याने आढळते. वाळवंट निर्माण होण्याची वेगवेगळी कारणे असतात. यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डेझर्टीफिकेशन. यात जमिनीवरील मातीची नैसर्गिक उत्पादन क्षमता कमी होत होत एका क्षणी पूर्णपणे संपून जाते. याला नैसर्गिक आणि मानवी कॄतीही जबाबदार असते. जमिनीवरील मातीचे मर्यादेबाहेर शोषण आणि क्लायमेट चेंज सारखे घटकही त्याला कारणीभूत असतात. जुना भौगोलिक इतिहास तपासला तर अधिकाधिक वाळवंट निसर्गतः निर्माण झालेली आढळतात. पण अलीकडच्या काळात हे प्रमाण मानवी कॄत्यांमुळे अधिक वाढले असल्याचे दिसते.

माती निकस करणारे शेतीतील प्रयोग, रासायनिक घटकांचा सर्रास वापर, जंगलाची कत्तल, प्रदूषण अशी वेगवेगळी कारणे दडली आहेत, ज्याचे परिणाम जगासमोर आहेत. डेझर्टीफिकेशन सोबतच व्हेदरींग हा घटकही त्याला कारणीभूत ठरतो आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानातील कमालीची तफावत परिसरातील पहाड, खडकांवर ताण निर्माण करते. त्यांचे तुकडे पडतात. अशा तप्त दगडांवर पडणारा पाऊस देखील हवेसोबतच्या घर्षणात भर घालून मोठाल्या दगडांच्या वाळूतील रुपांतरास कारणीभूत ठरतो. अशा ठिकाणी विपरीत परिस्थितीत, प्रतिकुल तापमानात जगण्याचे आव्हान काही मानवी समूह, काही प्राणी, काही झाडं पेलत असली तरी, या रेतीतील जीवन म्हणजे संघर्षाचे मूर्तीमंत उदाहरण ठरावे.

१४, २००, ००० चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेल्या ॲन्टार्टिक डेझर्ट पासून तर सर्वात कमी ४९०, ००० चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेल्या ग्रेट ब्रिटन डेझर्ट पर्यंत…. जगातील एकूण २३ पैकी, पहिल्या क्रमांकाच्या दहा वाळवंटांनी भूभागावरील ४६१८८००३ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे. हे व अन्य वाळवंट मिळून जमिनीचा एक तॄतिआंश भाग व्यापतात. भारतात राजस्थान, उत्तर -पश्चिम भाग, आणि पलीकडच्या पाकिस्तानातील पंजाब व सिंध प्रांतातील ७७०००चौरस किलोमीटर क्षेत्रात थार वाळवंट पसरले आहे.

थंड असो वा गरम, पॄथ्वीवरील तापमानातील बदलांसाठी ते कारणीभूत ठरतात. पाणीच नसल्याने वा कमी असल्याने त्या भागात बाष्पीभवनाची प्रक्रियाच होत नाही. झाली तरी ती फार कमी होते. शिवाय डस्ट स्टाॅर्म (रेतीचे वादळ) च्या प्रक्रियेत वेगवान वाऱ्यासोबत रेती, धूळ वाहून दुसरीकडे जाण्याचे प्रकार अनेकदा घडतात. झाडं, जमिनीवरील झुडपं नसल्याने जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होण्याचेही दुष्परिणाम आहेतच.

लाखो वर्षांपासून अस्तित्वात असलेली वाळवंटं निसर्गाची देण आहे असे मानले तरी अलीकडे निर्माण होत असलेल्या वाळवंटांचे काय, असा सवाल उपस्थित होतोच. उझबेकिस्तान आणि कझाकस्तान मधील समुद्रातील पाणी पूर्णपणे सुकल्याने निर्माण झालेले आराल्कूम वाळवंट ही जगातील सर्वात नवी नोंद आहे. आराल समुद्र म्हणजे एकेकाळचा जगातील चौथा मोठा जलसाठा होता. ६८००० चौरस किलोमीटर क्षेत्र त्याने व्यापले होते. पण असं म्हणतात की, या समुद्राला जाऊन मिळणाऱ्या आमू दर्या आणि सिर दर्या, या दोन नद्यांचे पाणी सोव्हिएतच्या सिंचन प्रकल्पांसाठी वळवले गेले, तेव्हा पासून, म्हणजे १९६०च्या दशकापासून हा समुद्र सुकायला सुरुवात झाली. आता तर हा समुद्र अक्षरशः काही छोट्या छोट्या तलावांमध्ये परिवर्तीत झाला आहे. कारण त्याच्या मूळ आकाराच्या केवळ दहा टक्के आकारच आता जलसाठा म्हणून शिल्लक राहिला आहे. उर्वरीत भाग रेताळ प्रदेश झाला आहे.

आता वर्ल्ड बँक आणि कझाकस्तान सरकारने पुढाकार घेऊन, निदान उरला आहे, तेवढ्या समुद्राचे रक्षण व्हावे म्हणून पावलं उचलली आहेत. हा समुद्र एकेकाळी स्थानिक मासेमारांसाठी आर्थिक उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत होता. आता तोही प्रभावीत झाला आहे. इतकेच नव्हे तर, वर्ल्ड बँकेच्या पुढाकारानंतरही आरल सागराचा दक्षिण भाग वाचवणे आता शक्यतेच्या पलीकडची बाब ठरू लागली असून, या दशकाच्या शेवटी तो भाग पूर्णपणे कोरडा पडलेला असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

आता या समुद्राच्या तळाशी उरलेले पांढऱ्या मीठाचे सुमारे ४५ चौरस किलोमीटर क्षेत्र आराल्कूम वाळवंट म्हणून ओळखले जाते. जगातील हे सर्वात नवीन वाळवंट, हा सर्वथा मानवी कॄत्याचा दुष्परिणाम ठरला आहे. एकेकाळी मासेमारी आणि पर्यटनासाठी ओळखला जाणारा हा भाग आता कोरडा ठणठणीत वाळवंट झाला आहे. त्या भागातील उन्हाळा अधिक उष्ण आणि हिवाळा आधीच्या तुलनेत अधिक थंड झाला आहे. याशिवाय आणखीही काही वातावरणीय बदल या क्षेत्रातील पर्यावरण तज्ज्ञ अनुभवत आणि नोंदवीत आहेत. बघूया, भविष्यात मानवी कॄत्याचे अजून कोणकोणते परिणाम सॄष्टीला भोगावे लागतात ते….

डॉ. प्रवीण महाजन
जल अभ्यासक,
डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी (महाराष्ट्र शासन).
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत `चला जाणूया नदीला` राज्यस्तरीय समिती सदस्य, (महाराष्ट्र शासन).
१८१, बाजार रोड, लक्ष्मीभुवन चौक ते रामनगर चौक रोड, धरमपेठ एक्स. नागपूर – ४४००१०
मो.- 9822380111 ईमेल :- [email protected]
Sea Desertification Process Human Being by Pravin Mahajan

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे पंचनामे पूर्ण; एवढ्या क्षेत्रावर झाले नुकसान

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – चिंटू आणि मिंटू

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - चिंटू आणि मिंटू

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011