इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील कांजिया गावात शनिवारी पहाटे तीन वाजता स्कॉर्पिओ कार तलावात पडल्याने आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आठ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे सर्व जण ताराबादीहून येत होते आणि किशनगंजकडे जात होते. मात्र, दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सर्वजण टिळक समारंभातून परतत होते स्थानिक प्रशासन मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कारमधील प्रवासी पूर्णिया जिल्ह्यातील ताराबादी भागात टिळक समारंभात सहभागी झाल्यानंतर किशनगंज जिल्ह्यातील नानिया गावाकडे जात असताना हा अपघात झाला.
उपविभागीय दंडाधिकारी तोशी यांनी सांगितले की, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते पूर्णिया-किशनगंज राज्य महामार्गाजवळील कांजिया मिडल स्कूलजवळील पाण्याखालील दरीत कोसळले. या घटनेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले, तर दोन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मृतांमध्ये पुरुष आहेत. स्थानिक प्रशासन लवकरच त्यांची ओळख आणि अपघाताचे नेमके कारण शोधून काढेल, असे मंडळ अधिकारी राज शेखर यांनी सांगितले.