वॉशिंग्टन – विज्ञानाचा उगम मानवी जिज्ञासेतून झाला आहे. वैज्ञानिकांनी अगदी माणसाच्या उत्क्रांतीपासून ते एकविसाव्या शतकापर्यंत विविध शोध लावून मानवी जीवन सहज केले आहे. विज्ञानामुळेच माणसाच्या जन्म आणि मृत्यूची कारणेही कळू शकली आहेत. याच आधारे माणसाने आता मृत्यूचे भाकित करणारे कॅलक्युलेटर तयार केले आहे.
माणसाचा मृत्यू कधी होईल याचा अंदाज लावणार्या कॅलक्युटरचा विज्ञानाविष्कार कॅनडाच्या संशोधन संस्थेत झाला आहे. कॅनडाच्या वैद्यकीय संघटनेच्या नियतकालिकेत एक अहवाल प्रकाशित झाला असून, सहा महिन्यांच्या आता होणार्या मृत्यूबाबत कॅलक्युलेटर भविष्यवाणी करण्यास सक्षम आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कुटुंबाला मिळणार इशारा
संशोधनात सहभागी झालेल्या वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तिच्या दैनंदिन व्यवहाराच्या क्षमतेत घट होण्यालाच मृत्यूचा इशारा मानला जातो. परंतु हे ऑनलाइन कॅलक्युलेटर वृद्ध लोकांच्या बदलत्या गरजा समजून घेण्यास मदत करणार आहे. तसेच कुटुंबीयांना त्यांची देखभाल करण्यास आणि काळजी घेण्यास सहाय्य करणार आहे.
हे कॅलक्युलेटर एका मुलाच्या योजनेत मदत करू शकते. जसे कामावरून सुट्टी कधी घ्यावी, आई-वडिलांसोबत भटकंतीसाठी कधी जावे आदी प्रकारचे नियोजन करू शकतो, असे ब्रुएरे रिसर्च इन्स्टिट्यू आणि कॅनडामध्ये ओटावा विद्यापीठातील संशोधक डॉ. अॅमी सू यांनी सांगितले.
पाच लाख लोकांवर संशोधन
कॅलक्युलेटर तयार करण्यासाठी वैज्ञानिकांनी ४,९१,००० हून अधिक वृद्धांवर आधारित माहितीचे विश्लेषण केले. २०१७ आणि २०१३ दरम्यान घरेलू देखभालीसाठी त्याचा वापर केला होता. आगामी पाच वर्षात ज्यांचा मृत्यू होऊ शकतो, अशांबाबतचे हे विश्लेषण होते.
ही माहिती देणे आवश्यक
ऑनलाइन कॅलक्युलेटचा वापर करताना लोकांना काही प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये लोकांना अतिताणतणाव किंवा स्ट्रोकसारखे आजार आहेत का, लोकांची निर्णय घेण्याची क्षमता, उलटी, सूज येणे, श्वासाचा त्रास, अनियोजित वजन घटणे, भूक कमी लागणे आदींबाबतची माहिती घेण्यात येते.