नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ व अभियंता इंजिनीयर अविनाश शिरोडे यांना “असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स (इंडिया)” या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेतर्फे दिला जाणारा स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल अतिशय मानाचा “जीवन गौरव पुरस्कार” एका दिमाखदार कार्यक्रमात हैदराबाद येथे प्रदान करण्यात आला. भारतातील सिव्हिल इंजिनियर्सची राष्ट्रीय स्तरावरील ही संस्था असून तिची स्थापना 1985 साली बंगलोर येथे झाली आहे. या संस्थेचे पाच हजार पेक्षा जास्त सभासद असून भारतभरात एकूण ३० सेंटर आहेत. अविनाश शिरोडे हे एक बहु आयामी व्यक्तिमत्व असून सिव्हिल इंजीनियरिंग व्यतिरिक्त इंजीनियरिंगच्या इतर ९ शाखांमध्ये ते काम करीत असतात. त्यांच्या नावे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार व मानसन्मान आहेत.
Scientist Avinash Shirode awarded with life time achievement award