इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या समानतेच्या युगात स्त्री आणि पुरुष यांच्यातील सामाजिक अंतर कमी झाले असून सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतात, हे सिद्ध झाले आहे, किंबहुना काही क्षेत्रात तर स्त्रिया या पुरुषांच्या पेक्षाही काकणभर सरसच दिसून येतात. मात्र निसर्ग नियमानुसार स्त्री आणि पुरुषांच्या शारीरिक रचनेत निश्चितच खूप मोठा फरक आहे.
परमेश्वर किंवा निर्मात्याने हा भेद निर्माण केला असून त्यामागे मानवी जीव सृष्टीची उत्पत्ती आणि नियमन कायम राहावे, असा हेतू दिसून येतो. सहाजिकच बाह्य बदल प्रमाणे शरीराच्या अंतर्गत देखील खूप मोठा भेद आहे. परंतु बुद्धीच्या बाबतीत तुलना केली तर स्त्री आणि पुरुषांची बुद्धी जवळपास सारखीच असते, असे म्हटले जाते.
मात्र काही शास्त्रज्ञांनी स्त्री आणि पुरुष यांच्या मेंदूचा अभ्यास केला असता असे निदर्शनास आले आहे की, स्त्रियांचा मेंदू हा पुरुषांच्या तुलनेत अधिक गरम असतो. त्यामुळे त्यांचे तापमान पुरूषांच्या मेंदूपेक्षा अर्धा अंशाने जास्त असते, असेही आढळून आले आहे. आपण एखाद्याला सहजपणे गरम डोक्याचा माणूस म्हणतो, म्हणजे पुरुष समजला जातो. त्यामानाने स्त्रिया शांत आणि संयमी मानल्या जातात. परंतु मेंदूच्या अभ्यासानुसार असे आढळून आले की, स्त्रियांचा मेंदू अधिक गरम असल्याने त्यांच्या शरीराचे तापमान ही काही प्रमाणात जास्त असते.
तसेच शरीरातील अंतर्गत बदलांचा देखील यावर परिणाम होतो, असे म्हटले जाते. त्यामुळे बाया गरम डोक्याचे असतात असे म्हणणे योग्य ठरणार नाही, कारण तो स्त्रियांचा अपमान ठरेल. वास्तविक यामध्ये कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही फक्त वैद्यकीय अभ्यास किंवा आरोग्य शास्त्रज्ञांना काय आढळून आले हे सांगण्यासाठी येथे ही माहिती नमूद करण्यात आली आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिलांचे डाेके जास्त गरम असते, असे लंडनमधील केम्ब्रिजच्या ‘एमआरसी लेबाॅरेटरी फाॅर माॅलिक्युलर बायाेलाॅजी’ या संस्थेने यासंदर्भात एक संशाेधन केले. त्यानुसार तापमानाबाबत चकित करणारी माहिती समाेर आली आहे. सर्वसाधारणत: शरीरातील इतर भागाचे तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत राहते, तर मेंदूचे सरासरी तापमान ३८.५ अंश सेल्सिअस एवढे असते. मात्र, मेंदूच्या आतील भागाचे तापमान ४० अंश सेल्सिअस एवढे राहते. डाेक्याला दुखापत झालेल्या रुग्णांच्या बाबतीतही असे हाेण्याची शक्यता आहे.
रात्रीच्या तुलनेत दिवसा महिलांच्या डाेक्याचे तापमान जास्त राहते. ते ४० अंश सेल्सिअसपर्यंतही जाऊ शकते, असे संशाेधकांचे म्हणणे आहे. तसेच तापमान अधिक असण्यामागे मासिक पाळीचे कारण आढळल्याचे संशाेधनामध्ये सहभागी असलेले डाॅ. जाॅन ओनील यांनी सांगितले. मेंदूचे तापमान अनेकदा खूप वाढते. शरीराचे तापमान एवढे वाढल्यास अंगात ताप असल्याची नाेंद हाेते. तसेच वाढत्या वयामुळे मेंदूची क्षमता कमी झाल्याने तापमान वाढते असे संशाेधकांचे म्हणणे आहे.
science research report which head temperature is more male or female