नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
‘एक मच्छर आदमी को हिजडा कर देता है’ हा नाना पाटेकर यांचा फेमस डायलॉग आपल्याला माहिती आहे. आणि त्यात बऱ्यापैकी सत्यताही आहे. एक डास मारण्यासाठी आपल्याला इतक्या टाळ्या वाजवाव्या लागतात, की त्यातून तसाच फील येतो. पण तुम्ही रात्री झोपेत असताना डास तुमच्या कानाजवळच का गाणं म्हणतात, नाकाजवळ किंवा तोंडाजवळ का म्हणत नाहीत, असा प्रश्न आपल्याला पडला आहे का?
रात्री झोपेत असताना कानाजवळ डास गुणगुणला की आपण ब्लाईंडली हात फिरवतो आणि डास मारण्याचा प्रयत्न करतो. यात बरेचदा आपल्याच कानफटात आपण लगावून देतो. आणि लाईट लावून तो डास शोधण्याचा प्रयत्न केला, तर पुन्हा त्याचा शोध लागत नाही. आणि लाईट बंद केला की तोच डास पुन्हा तुमच्या कानापाशी येऊन गुणगुणायला लागतो. कानापाशी गुणगुणणारा डास मारणं म्हणजे लकी ड्रॉ आहे, असं म्हटलं तरी चालेल. पण हा डास गाणं म्हणण्यासाठी कानापाशीच स्टेज का शोधतो, हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर फारच इंटरेस्टींग आहे. असं म्हणतात की, डास नेहमी घाण जागेच्या शोधात असतो. आणि तज्ज्ञांनुसार कान ही शरीरावरील घाण जागा आहे. कानाला कमालीचा घाण वास असतो. त्यामुळे डास हा गाणं म्हणण्यासाठी कानाची निवड करतो.
वास असतो म्हणून
कीटक शास्त्रज्ञ म्हणतात की, कानाला खूप वास असल्यामुळे डासांना कानाच्या आसपास राहायला खूप आवडतं. तो वासच डासांना आकर्षित करतो. म्हणून डास आणि माशी आपल्याला घाणीच्या जागेवर जास्त दिसतात. आणि त्यामुळे आजारांनाही आमंत्रण मिळण्याची शक्यता असते.
तो तर पंखांचा आवाज
डास आपल्या कानाजवळ गुणगुणतो तेव्हा तो त्याचा आवाज असतो, असे म्हटले जाते. पण ते चुकीचे आहे. मुळात तो डासांच्या गुणगुणण्याचा आवाज नसून त्यांच्या पंखांच्या फडफडण्याचा आवाज असतो. एका सेकंदात २५० वेळा पंख फडफडण्याची क्षमता डासांमध्ये असते.
Science Research Mosquito Sing Song Near Ear