मुंबई – गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू होण्याची दाट चिन्हे आहेत. यासंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी माहिती दिली आहे. राज्यभरातील सर्व शाळा १५ ऑगस्ट नंतर सुरू होऊ शकतात. यासंदर्भात पुढील आठवड्यात शिक्षण विभागाची महत्त्वाची बैठक होत आहे. त्यात अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत इयत्ता ८वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, त्या त्या ठिकाणची कोरोना स्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. नव्या बाधितांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. या सर्वांचा विचार करुन आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबत आम्ही गांभिर्याने चर्चा करीत असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/ANI/status/1423658110229516298