इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शैक्षणिक क्षेत्रात करिअर आणि अध्यापनाच्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. नवोदय विद्यालय समितीने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. तब्बल १६१६ पदांसाठी ही भरती होणार आहे. नवोदय विद्यालय हे केंद्र सरकारच्यावतीने चालविले जातात. त्यामुळे येथे नोकरी मिळणे हे अनेकांचे स्वप्न असते. आता निघालेल्या या भरतीत अर्ज करायला विसरु नका.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वरच अर्ज करावा. १६१ रिक्त जागांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना येत्या २२ जुलै पर्यंत अर्ज करण्याठी मुदत आहे. NVS प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), पदव्युत्तर शिक्षक (PGT) व्यतिरिक्त संगीत, कला, PET पुरुष, PET महिला यासह विविध विषयांसाठी शिक्षक तसेच ग्रंथपाल आणि प्राचार्य या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
उमेदवारांना मुख्याध्यापक पदासाठी २ हजार रुपये, पीजीटी पदांसाठी अठराशे रुपये आणि टीजीटी आणि विविध श्रेणीतील शिक्षकांसाठी पंधराशे रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. संस्थेकडे प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांसाठी १०२६, पदव्युत्तर शिक्षकांसाठी ३९७ पदे, विविध श्रेणीतील शिक्षकांसाठी १८१ पदे आणि मुख्याध्यापक पदासाठी १२ पदे रिक्त आहेत. सर्व पदांसाठी अर्जदार उमेदवारांना त्यांच्या संगणकावर आधारित चाचणी आणि संयुक्त मुलाखतीतील कामगिरीच्या आधारावर निवडले जाईल.
असा करा अर्ज
प्रथम उमेदवार NVS च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या – navodaya.gov.in.
येथे मेनपेज (मुख्यपृष्ठ ) वर, NVS भर्तीसाठी उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करा.
येथून आता नवीन विंडोवर जाता येईल.
त्यानंतर वैयक्तिक तपशील, पोस्ट तपशील, परीक्षा आणि शैक्षणिक/व्यावसायिक पात्रता प्रविष्ट करा.
आता एंटर करा आणि अर्ज सेव्ह करा.
फॉर्म सबमिट करा आणि अर्ज फी भरा.
फॉर्म डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.
School Teacher Job Recruitment Vacancy Opportunity Navodaya Vidyalaya