इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला योग्य मार्गावर घेऊन जाण्याची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर असते. परंतु हेच शिक्षक किंवा त्यांचे अधिकारी भ्रष्टाचार करणारे असतील तर समाजात कोणता संदेश जाणार हे सांगण्याची गरज नाही. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विभागीय शिक्षण अधिकारी आर. पी. सिंह याने भ्रष्टाचाराची एक नवी पद्धत शोधून काढली आहे. त्याच्या या कृष्णकृत्यामुळे सगळेच अचंबित झाले आहेत.
सिंहविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे. या आरोपांच्या चौकशीची जबाबदारी अयोध्या आणि देवीपाटण येथील विभागीय सहाय्यक शिक्षण संचालकांना देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे संयुक्त सचिव कामता प्रसाद सिंह यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
सिंह याच्यावर आरोप आहे, की तो पत्नीला घटस्फोट देऊन तिच्यासोबत राहत होता. पत्नीच्या नावावर विमा एजन्सी घेतली आणि शिक्षक-शिक्षिकांना जबरदस्तीने विमा पॉलिसी विक्री केली. एका कामासाठीच्या आकस्मिक वस्तूच्या आर्थिक तरतुदीतून दोन पैसे लाटत होता, तसेच शिक्षकांचे वेतन प्रमाणपत्रांविना जारी करत होता.
आर. पी. सिंह याने देवीपाटण आणि अयोध्या विभागात कार्यरत असताना अनेक प्रकारचे अनियमित काम केले आहे. कायदेशीर कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी पत्नीला घटस्फोट देऊन तो तिच्यासोबत राहत होता. आपल्या कामाच्या ठिकाणी तैनात शिक्षकांना जबरदस्तीने विमा पॉलिसी विक्री केली आणि लाखो रुपयांचे कमशिन कमावले. असे करणे बेकायदेशीर आहे.
एका शिक्षिकेला भीती दाखवून तिचा छळ आणि शोषण केल्याचा आरोपही सिंह याच्यावर आहे. ज्या शिक्षकांनी त्याच्याकडून पॉलिसी घेतली, त्यांना बेकायदेशीररित्या सवलत देण्यात आली. तर ज्या शिक्षकांनी पॉलिसी घेतली नाही, त्यांचा छळ करण्यात आला. एका ठिकाणी सर्व शिक्षकांकडून पॉलिसी घेतल्यानंतर तो नंतर दुसऱ्या ठिकाणी बदली करवून घेत होता.