इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – झारखंडच्या जमशेदपूरमधून एख धक्कादायक वृत्त समोर आले आहे. शाळेत कॉपी करत असल्याच्या संशयावरुन शिक्षिकेने संपूर्ण वर्गासमोर विद्यार्थिनीला काढायला लावले. या मुलीची तपासणी केली. त्यामुळे ही विद्यार्थिनी प्रचंड नाराज झाली. घरी आल्यानंतर या विद्यार्थिनीने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले आणि रॉकेल ओतून पेटवून घेतले. गंभीर भाजलेल्या मुलीला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. ती ८० टक्क्यांहून अधिक भाजली होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी सरकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आरोपी शिक्षिकेवर कारवाईची मागणी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, जमशेदपूरच्या साकची येथील शारदामणी कन्या शाळेत नववीच्या वर्गात ही विद्यार्थिनी शिकते. कॉपी केल्याच्या संशयावरून शिक्षिकेने तिचे कपडे काढले आणि तिची झडती घेतली. विद्यार्थिनीकडे काहीही सापडले नाही. परंतु या घटनेमुळे ती खूप दुखावली गेली. अशा स्थितीत घरी आल्यानंतर तिने स्वत:ला पेटवून घेतले. त्यानंतर घरच्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. ती ८० टक्के भाजल्याने डॉक्टरांनी स्पष्ट केले की तिची प्रकृती चिंताजनक आहे. अखेर या विद्यार्थिनीचे निधन झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो नागरिकांनी शाळेपासून शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. रुग्णालयापासून शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शाळा बंद करण्यात आली आहे. शिक्षिकेच्या बडतर्फीचे आदेश देण्यात आले आहेत.
विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून घेतल्यानंतर तिचे कुटुंबीय आणि छाया नगर परिसरातील नागरिक आज सकाळी शाळेच्या आवारात पोहोचले. तेथे निदर्शने करण्यात आली. मात्र, या घटनेनंतर आज शाळा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलक शाळेच्या मुख्य गेटबाहेर बसून राहिले. अनेक तास तेथे ठिय्या आंदोलन केल्यानंतर आंदोलकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आरोपी शिक्षिकेवर कारवाई करावी आणि विद्यार्थिनीच्या उपचाराचा खर्च शाळेने द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. संतप्त आंदोलकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकले आहे.
School Teacher Copy Case Cloth Checking Suicide