मुंबई – राज्यभरात शाळा सुरू झाल्यानंतर आता एक चिंताजनक बाब समोर आली आहे. नवी मुंबईतील एका शाळेतील १६ विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. तर, नागपूरमध्ये एका शाळेतील एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे.
नवी मुंबईतील एका शाळेतील ६५० विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. त्यातील १६ विद्यार्थ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एका विद्यार्थ्याचे वडील परदेशातून आले होते. त्यांच्या घरातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. पण, या विद्यार्थ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता एकूण १६ विद्यार्थी बाधित झाल्याचे समोर आले आहे. आता ही शाळा काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूरमध्ये एका शाळेतील एक विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. हा विद्यार्थी १५ वर्षे वयाचा आहे. याची तत्काळ दखल घेत शाळा एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे. ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.