मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आल्याची माहिती परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.
या परीक्षेसाठीची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची १८ ऑगस्ट, २०२२ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. तसेच अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे आयुक्त श्रीमती दराडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
School Scholarship Answer Sheet Declare
Education