इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘केरळ स्टोरी’ या चित्रपटानंतर संपूर्ण देशात वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. यात कुठेही हिंदू मुले किंवा मुलींवर इतर धर्माकडून बळजबरी होत असेल, तर लगेच दखल घेतली जात आहे. अशात मध्यप्रदेशातील एका शाळेत हिंदू मुलींचा चक्क हिजाबमध्ये फोटो प्रसिद्ध झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेशातील दमोह जिल्ह्यात गंगा जमना हायस्कूल आहे. या शाळेने परीक्षेत प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचे फोटो एका बॅनरवर लावले आहेत. या बॅनरमध्ये मुस्लीम मुलींप्रमाणे हिंदू मुलींच्या डोक्यावरही हिजाब दिसत आहे. या बॅनरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर शाळेच्या विरोधात अनेकांनी दंड थोपटले आहेत.
शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. शाळेमध्ये हिंदू मुलींना बळजबरीने हिजाब घालायला लावत आहेत, असा आरोपही केला गेला आहे. या गोष्टीची दखल मध्यप्रदेश सरकारने घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. या मुलींची नावे लक्ष्मी पटेल, पलक जैन, वृंदा चौरसिया आणि रुपाली शाहू अशी आहेत. या मुलींच्या डोक्यावर हिजाब दिसत आहेत. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या गोष्टीची दखल घेतली आहे. कुठल्याही प्रकारची तक्रार आलेली नसली तरीही प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षकांना चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे नरोत्तम मिक्षा यांनी म्हटले आहे.
चौकशीसाठी पथक
जिल्हाधिकारी मयंक अग्रवाल यांनी या प्रकरणाची यापूर्वीच चौकशी झाली, मात्र काहीही आढळून आले नाही, असे सांगितले. पण तरीही गृहमंत्र्यांच्या सूचनेनुसार, पुन्हा एकदा चौकशी करण्यासाठी तहसलीलदार, शिक्षणाधिकारी आणि पोलीस यांचे पथक तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
संस्थाचालक काय म्हणतात?
या शाळेचे मालक तसेच संस्थाचालक मुश्ताक खान यांनी कोणत्याही हिंदू मुलीवर हिजाब घालण्यासाठी बळजबरी केलेली नसल्याचे म्हटले आहे. गणवेशात फक्त हेडस्कार्फचा समावेश आहे. पण तरीही या प्रकरणात शाळेतील अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत, असेही ते म्हणाले.
School Hindu Girl Hijab Photo Viral