अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मुळाण ग्रामपंचायत असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या पाच वर्षापासून शाळेची इमारत जिर्ण झाल्याने ती काढून टाकलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चार वर्षापासून समाज मंदिराच्या सभा मंडपात बसून शिक्षण घेत आहेत. ग्रामपंचायतीची व्यायाम शाळा ही विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात जरी उपलब्ध करून दिली तरी विद्यार्थ्यांना समाज मंदिराचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्हापरिषदेने तातडीने शाळा बांधावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.