मुंबई – राज्यातील शाळांना शालेय शिक्षण विभागाकडून दिवाळीच्या सुट्यांची घोषणा झाली आहे. सरकारच्या आदेशानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाळी संलग्न असलेल्या प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या काळात दिवाळीची सुटी असणार आहे. या दरम्यान, शाळा ऑनलाईन वर्गही बंद ठेवतील, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. मात्र, शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच्या वेळापत्रकात दिवाळीच्या सुट्या १ ते २३ नोव्हेंबर अशा दर्शविल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, शाळा, पालक आणि विद्यार्थ्यी यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. नक्की कोणते दिवस आणि किती दिवस दिवाळी सुट्या आहेत, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
शालेय शिक्षण विभागाने आज काढलेले आदेश असे