मुंबई – लहान मुलं पोट दुखतंय, डोकं दुखतंय असे बहाणे करून शाळेला बुट्टी मारण्याचा प्रकार जुन्या काळापासून करत आले आहेत. अगदी आजची पिढीही ही परंपरा फॉलो करीत आहे. मात्र कोरोनाच्या काळात एक नवा आणि चुकीचा पायंडा काही लोक घालत आहेत. लॅटलर फ्लो टेस्ट (एलएफटी)च्या कीटमध्ये सॉफ्ट ड्रींक आणि फळांचा रस टाकून आम्लपणामुळे रिपोर्ट पॉझिटिव्ह आणत आहेत. एका प्राध्यापकाने याचा छडा लावल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
ब्रिटनचे एका विद्यापीठाचे प्रो. मार्क लॉर्च यांनी ही बाब उघडकीस आणली आहे. त्यांनी सर्वांत पहिले सॉफ्ट ड्रिंक आणि फळांच्या रसांचे काही थेंब एलएफटीच्या किटमध्ये टाकली. त्यानंतर काहीच क्षणांमध्ये स्क्रीनवर पॉझिटिव्ह रिपोर्ट बघायला मिळाला. कीट उघडून बघितल्यावर यात कागदासारखा पदार्थ नायट्रोसॅल्यूलोजची पट्टी आणि छोटे लाल रंगाचे झाड आढळले. या झाडात कोरोना व्हायरसा बांधण्यासाठी अँटीबॉडी असतात. जेव्हा एलएफटी टेस्ट केली जाते तेव्हा सॅम्पलला बफर सोल्यूशनसोबत मिक्स केले जाते.
आम्लपणामुळे शंका
फळांचा रस आणि कोल्ड ड्रिंकमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे हे दोन्ही आंबट आहेत. संत्र्याच्या रसात सायट्रिक अॅसीड, कोलामध्ये फॉस्फरिक अॅसीड आणि सफरचंदाच्या रसात मॅलिक अॅसीड आहे. या सर्वांचा पीएच स्तर 2.5 ते 4 च्या दरम्यान असतो. अँटीबॉडीसाठी हा स्तर प्रतिकुल आहे. त्यामुळे एलएफटीवर परिणाम होतो.