लागोस (नायजेरिया) – दक्षिण आफ्रिकेतील नायजेरियात मध्ये सध्या अत्यंत अनिश्चिततेचे आणि भीतीचे वातावरण आहे. कारण या ठिकाणी वारंवार अपहरणाचे प्रकार घडत आहेत. पैशाची खंडणी मागण्यासाठी अपहरणाच्या प्रकरणांवरून नायजेरियात भीतीचे वातावरण आहे. त्यातच सशस्त्र अपहरणकर्ते उत्तर नायजेरियाच्या एका शाळांमध्ये घुसले आणि त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून सुमारे २०० विद्यार्थ्यांचे अपहरण केले. यात एका मुलाचा मृत्यू झाल्याचे समजते.
गेल्या वर्षी डिसेंबरपासून अपहरणाचे सत्र सुरू आहे. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अपहरणाचे एक प्रकरण समोर आले होते. आता पुन्हा नायजेरियातील उत्तर मध्य नायजेर राज्यात रविवारी जादा क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सरकारी क्षेत्रातील टेगीना येथे असलेल्या शासकीय माध्यमिक विद्यालयामध्ये घडली असून सुमारे २०० विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले आहे.
नायजर राज्य पोलिसांनी सांगितले की, एका बंद वाहनावर मोठ्या संख्येने शस्त्रे होती. यावेळी टोळीतील लोकांनी गोळीबार करून विद्यार्थ्यांचे अपहरण केले. याचदरम्यान गोळी लागून एका मुलाचा मृत्यू झाला. खंडणीच्या पैशांच्या मागणीसाठी अपहरणाच्या प्रकरणांवरून नायजेरियात भीतीचे वातावरण आहे.
सुमारे एक महिन्यापूर्वी पश्चिम नायजेरियातील कडूना राज्यातील ग्रीनफिल्ड विद्यापीठातून विद्यार्थी आणि कर्मचार्यांचे अपहरण करण्यात आले. त्यावेळी एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात हजारो डॉलर्सची खंडणी मागितली गेली होती. खंडणीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांवर दबाव आणण्यासाठी त्यांनी पाच विद्यार्थ्यांचा बळी घेतला. दरम्यान, अशा घटना सातत्याने घडत असल्याने अनेक शाळा बंद आहेत.