रविवार, ऑगस्ट 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांना पारितोषिक वितरण…नाशिक विभागातील या शाळांचा सन्मान

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 14, 2024 | 7:31 pm
in संमिश्र वार्ता
0
mazi shala e1728759096143

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासन विविध योजनांच्या माध्यमातून शाळांमध्ये बदल घडवित असून त्यांचा दर्जा सुधारत आहे. मुलांना जीवनाशी निगडित बाबी शिकविण्याचा प्रयत्न केला जातोय. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला देखील मोठा प्रतिसाद मिळाला असून या अभियानातून विद्यार्थीपूरक बदल घडत आहेत, असे सांगून शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास प्राधान्य दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

व्यक्तिमत्व विकासास चालना देणारे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. हा पारितोषिक वितरण समारंभ येथील एनसीपीएच्या भाभा सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांचे अभिनंदन केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव आय.ए.कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, शाळा हा आपल्या आयुष्यातील हळुवार कोपरा असतो. शाळा आणि शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करतात. शाळा ही आयुष्यातील ज्ञान मंदिर असते. शाळा विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि देश घडवते. आईवडील जन्म देतात तर शिक्षक हे आयुष्य घडवतात. विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक घडवण्यासाठी मोठे योगदान देतात. त्यामुळे गुरूजनांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक, महिला अशा समाजातील सर्व घटकांसाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. शिक्षक आणि शासकीय कर्मचारी हा देखील महत्त्वाचा घटक असून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शासन सकारात्मक निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. राज्य उद्योग, जीडीपी, विदेशी गुंतवणूक अशा विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असून हे स्थान कायम राखण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांच्या उन्नतीसाठी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. 30 हजार शिक्षक भरती, केंद्र प्रमुखांच्या जागा भरणे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत भरघोस वाढ, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील बोजा कमी करण्यात यश, टप्पा अनुदान लागू असे विविध निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्काराचे स्वरूप –
राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला 51 लाख रुपये, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 31 लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 21 लाख रुपये. विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला 21 लाख, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 15 लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 11 लाख रुपये. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेला 11 लाख, द्वितीय क्रमांकास पाच लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख रुपये. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक तसेच प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह दिले गेले.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांची यादी –
राज्यस्तरीय पुरस्कार – शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था गट – प्रथम- जिल्हा परिषद आदर्श पाथमिक शाळा धानोरे, जिल्हा, पुणे; द्वितीय – नवी मुंबई महानगरपालिका राजश्री शाहू महाराज विद्यालय शाळा क्रमांक 55; तृतीय – जवाहरलाल नेहरू नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा रामनगर, जिल्हा- गडचिरोली.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा – प्रथम – प्रभात किड्स स्कूल अकोला जिल्हा अकोला, द्वितीय -कर्मवीर आ.मा.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर, जिल्हा धुळे; तृतीय – कै. दशरथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जवखेडा खुर्द, जिल्हा जालना.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र गट- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा – प्रथम- कलेक्टर कॉलनी मनपा उ.प्रा. हिंदी शाळा शिवशक्ती नगर, चेंबूर, मुंबई; द्वितीय- मुंबई पब्लिक स्कूल वरळी सीफेस मनपा उ.प्रा. इंग्रजी शाळा, वरळी, मुंबई; तृतीय- महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा रामकृष्ण परमहंस मार्ग, वांद्रे पूर्व, मुंबई.

उर्वरित इत्तर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा – श्रीराम वेल्फेअर सोसायटीज हायस्कूल, मुंबई; सीईएम मायकल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कुर्ला; द बयरामजी जीजीभॉय पारसी चॅरिटेबल इंस्टिट्युशन, चर्नी रोड पूर्व, मुंबई.

वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र गट – शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा – प्रथम – पुणे मनपा भारतरत्न पंतप्रधान स्व.अटलविहारी वाजपेयी विद्यानिकेतन क्र.16, वडगाव बुद्रुक, पुणे; द्वितीय – महानगरपालिका शाळा क्रमांक 86 (मुली) पाथर्डीगाव, नाशिक; तृतीय- श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेशन क्र.1, शुक्रवार पेठ, पुणे.

उर्वरित इत्तर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा – न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड सदाशिव पेठ, पुणे; सरस्वती विद्यालय माध्यमिक शाळा, नागपूर; श्री शिवाजी मराठा हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, शुक्रवार पेठ, पुणे.

मुंबई विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा– प्रथम- जिल्हा परिषद शाळा, कोटबी बुजडपाडा, जिल्हा पालघर; द्वितीय – रायगड जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा वडगाव, जिल्हा रायगड; तृतीय – जिल्हा परिषद शाळा कालवार, जिल्हा ठाणे.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा – प्रथम -जिंदाल विद्यामंदिर वाशिंद, जिल्हा ठाणे; द्वितीय – श्री स.तु. कदम माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पालघर, जिल्हा पालघर; तृतीय – जनता शिक्षण संस्थेचे श्री मोहनलाल सोनी विद्यालय व श्री नानासाहेब कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय बोर्ली पंचतन, जिल्हा रायगड.

पुणे विभाग – शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा – प्रथम- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संवत्सर, जिल्हा अहिल्यानगर; द्वितीय – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी (शिवणे), जिल्हा – सोलापूर; तृतीय – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर, जिल्हा पुणे.

उर्वरित इतर व्यवस्थापनाच्या शाळा– प्रथम- गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव, जिल्हा पुणे; द्वितीय- सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ, जिल्हा अहिल्यानगर; तृतीय – महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बार्शी, जिल्हा सोलापूर.

नाशिक विभाग– शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा – प्रथम – शासकीय विद्यानिकेतन धुळे, जिल्हा धुळे; द्वितीय – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळपाडा, जिल्हा नाशिक; तृतीय- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिलखेडे, जिल्हा जळगाव.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा- प्रथम- एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार, जिल्हा नंदुरबार; द्वितीय – माध्यमिक विद्यालय करंज, जिल्हा जळगाव; तृतीय- अनु.कै.डी.एन.देशमुख आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा आठंबे, जिल्हा नाशिक.

कोल्हापूर विभाग– शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा- प्रथम- जिल्हा परिषद शाळा सिद्धेवाडी, जिल्हा सांगली; द्वितीय- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे (मिलिटरी), जिल्हा सातारा; तृतीय- जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नंबर 5, जिल्हा रत्नागिरी.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा – प्रथम- अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी, जिल्हा सांगली; द्वितीय- न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाट, जिल्हा कोल्हापूर; तृतीय- ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालय शिरवळ, जिल्हा सातारा.

छत्रपती संभाजी नगर विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा – प्रथम – जिल्हा परिषद आदर्श उच्च माध्यमिक शाळा जळगाव मेटे, जिल्हा छत्रपती संभाजी नगर; द्वितीय – जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय प्राथमिक शाळा बोरगव्हाण, जिल्हा परभणी; तृतीय -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवपिंपळगाव, जिल्हा जालना.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा- प्रथम- हु. बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत, जिल्हा हिंगोली; द्वितीय – सरस्वती साधना विद्यामंदिर शांतीवन आर्वी, जिल्हा बीड; तृतीय- श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी, जिल्हा परभणी.

अमरावती विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा- प्रथम- जिल्हा परिषद (मा.शा) माध्यमिक (मराठी) कन्या शाळा, कॅम्प अमरावती, जिल्हा अमरावती; द्वितीय- आदर्श जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोराखेडी, जिल्हा बुलढाणा; तृतीय- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा तिवसा, जिल्हा यवतमाळ.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा- प्रथम- जे.सी. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज कारंजा लाड, जिल्हा वाशिम; द्वितीय- सीताबाई संगई कन्या शाळा सुरजी, जिल्हा अमरावती; तृतीय- डी.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दाताळा, जिल्हा बुलढाणा.

नागपूर विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा – प्रथम- पी एम श्री जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा हिरडामाली, जिल्हा गोंदिया; द्वितीय- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चनकापूर, जिल्हा नागपूर; तृतीय – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा, जिल्हा चंद्रपूर.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा– प्रथम – नवजाबाई हितकारिणी हायस्कूल ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर; द्वितीय – नवजीवन विद्यालय अँड ज्युनिअर सायन्स कॉलेज जमनापूर साकोली, जिल्हा भंडारा; तृतीय- सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी/ मोर, जिल्हा गोंदिया.

लातूर विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा- प्रथम- जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी, जिल्हा नांदेड; द्वितीय- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सताळा (बु.), जिल्हा लातूर; तृतीय- पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला ईट, जिल्हा धाराशिव.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा- प्रथम- श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव, जिल्हा धाराशिव; द्वितीय- कै. जनार्दनराव राजेमाने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक (कला व विज्ञान) आश्रम शाळा, जानवळ, जिल्हा लातूर. तृतीय- श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर, जिल्हा नांदेड.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य मंत्रिंडळाच्या या धडाकेबाज निर्णयाबाबत जाणून घ्या सविस्तर….

Next Post

गिरणी कामगारांसाठी ८१ हजार घरे बांधण्यासाठी करार….

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी झटपट लाभाचा मार्ग तूर्तास टाळावा, जाणून घ्या, रविवार, २४ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 23, 2025
IMG 20250823 WA0414 1
स्थानिक बातम्या

‘करघा पैठणी द क्वीन ऑफ सारीज’ या चित्रपटाचे येवल्यात स्पेशल स्क्रिनिंग…मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

ऑगस्ट 23, 2025
GzBKF1PXoAA7lsG
महत्त्वाच्या बातम्या

अमित ठाकरे यांनी घेतली मंत्री आशिष शेलार यांची भेट…पत्रकार परिषद घेऊन सांगितले भेटीमागील कारण

ऑगस्ट 23, 2025
GzCFBWUa8AAKrj5
मुख्य बातमी

राज्यभरातून मला आतापर्यंत ३६ लाखांहून अधिक भगिनींनी राख्या पाठविल्या…मुख्यमंत्र्यांनीच दिली ही माहिती

ऑगस्ट 23, 2025
post
संमिश्र वार्ता

अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित…हे आहे कारण

ऑगस्ट 23, 2025
Untitled 38
महत्त्वाच्या बातम्या

ईडीची मोठी कारवाई…आमदाराला अटक, १२ कोटीची रोख रक्कम व ६ कोटीचे दागिने जप्त

ऑगस्ट 23, 2025
WhatsApp Image 2025 08 22 at 18.17.36
संमिश्र वार्ता

विठू माझा लेकुरवाळा’ने श्रोते मंत्रमुग्ध…२५० बालकलावंतांचा भक्तीचा जागर, रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

ऑगस्ट 23, 2025
प्रातिनिधिक फोटो
इतर

अल्पवयीन मुलीस परिचीताने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

ऑगस्ट 23, 2025
Next Post
Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

गिरणी कामगारांसाठी ८१ हजार घरे बांधण्यासाठी करार….

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011