मुंबई – मुंबई वगळता राज्यातील इतर विभागातील शाळा सुरुच राहणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत राज्यातील शाळा आणि लसीकरणाचा आढावा घेतल्यानंतर शिक्षण विभागाने ही भूमिका घेतली आहे. या बैठकीत राज्यातील शाळा बंद न करता नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.
महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबई महानगरातील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा करण्याचा निर्णय घेतला. पण, या निर्णयात ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यातील शाळा बाबत शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, आता शिक्षण विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोनाच्या तिस-या लाटेमुळे राज्य शासनाने अगोदर निर्बंध जारी केली आहे. ते पुढील काळात अधिक कडक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.