पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी सरोजिनी दामोदरन फाऊंडेशन मार्फत महाराष्ट्र शिष्यवृत्ती कार्यक्रम २०२२ अंतर्गत इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी फाऊंडेशनने राज्यभरातील दोन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या दारीद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना सन २०२२ महाराष्ट्र, स्टेट बोर्डात इयत्ता १० वी मध्ये ८५ टक्के हून अधिक गुण आणि प्रत्येक विषयात ए प्लस श्रेणी (७५ टक्के अपंग विद्यार्थ्यांना) असेल असे विद्यार्थी या शिष्यवृतीसाठी पात्र ठरणार आहेत.
सरोजिनी दामोदरन फाऊंडेशन , सौ.कुमारी शिबुलाल आणि श्री. स.द. शिबुलाल (इन्फोसिस चे सहसंस्थापक) ह्यांनी स्थापन केलेल्या या संस्थेसाठी विद्याधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्रात शिकत असले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार आहेत. निवडक विद्यार्थ्यांना इयत्ता ११वी आणि १२ वी साठी शिष्यवृत्ती रुपये १०,०००/‚ प्रति वर्षी दिले जातील. जर त्यांची प्रगती दरवर्षी उत्तमोत्तम राहिली तर त्यांच्या आवडीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी रुपये १०,००० ते ६०,००० प्रतिवर्षी मिळतील.
जे विद्यार्थी ह्यावरील अटी पूर्ण करत असतील त्यांनी www.vidyadhan.org ह्या संकेतस्थळाला भेट देऊन ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी कृपया vidyadhan.maharashtra@sdfoundationindia.com वर अथवा मोबाईल नंबर ८३९०४ २१५५० / ९६११८ ०५८६८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सरोजिनी दामोदरन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
Scholarship for Needy SSC Passed Students