पुणे – देशातील AIIMS, IIM,IIITs, NIT, IISc & IISER,Institution of National Importance & Other Colleges या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध घट्कातील विद्यार्थ्यांनासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली जाते.
राज्यातील १०० अनुसूचित जातीच्या /नवबौद्ध घट्कातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळ्णार आहे. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड्ळनिहाय १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. सदर योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापिठ/ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवुन दिलेले पुर्ण शिक्षण शुल्क, नोद्णी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापिठ/ शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यात जमा करण्यात येईल. वसतीगृह व भोजन शुल्क याचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च देण्यात येणार आहे. तसेच पुस्तकांसाठी ५ हजार रुपये व इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार असे रुपये १० हजार दोन ट्प्यात अदा केले जाणार आहे.
सदर योजनेविषयी आधिक माहिती, जाहिरात, अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ≥≥ जलद दुवे ≥≥ रोजगार या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली आहे. सदर संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन तो परिपुर्ण भरुन प्रथमता: ईमेल द्वारे swcedu.nationalscholar@gmail.com या ईमेल वर पाठवून त्याची हार्ड कॉपी कागदपत्रासह बुधवार दि १०.११.२०२१ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत आयुक्त,समाज कल्याण,महाराष्ट्र राज्य,३ चर्च पथ पुणे येथे सादर करावी.
पदवी /पदव्युतर पदवी/ पदव्युतर पदविका पुर्णवेळ अभ्यासक्रसाठी या योजनेचा लाभ देय असणार आहे. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्याच विद्यार्थ्याना याचा लाभ मिळणार आहे. सदर योजनेसाठी सन २०२१-२२ करिता जास्तीत जास्त विद्यार्थानी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.