मंगळवार, ऑक्टोबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सार्वजनिक वितरण प्रणाली पुरवठा साखळीत सुधारण्यासाठी आता आले हे पोर्टल….

डिसेंबर 5, 2024 | 11:29 pm
in संमिश्र वार्ता
0
WhatsAppImage2024 12 05at7.10.39PM12M9R

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री, प्रल्हाद जोशी यांनी ‘अन्न चक्र’ या पोर्टलचा प्रारंभ केला. सार्वजनिक वितरण प्रणालीमधील पुरवठा साखळीच्या कामामध्‍ये सुधारणा घडवून आणण्यासाठी साधन आणि स्कॅन (सबसिडी क्लेम ॲप्लिकेशन फॉर एनएफएसएफ) पोर्टल सुरू केले. सार्वजनिक वितरण प्रणाली आणि राज्यांच्या अनुदान दाव्याच्या यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे.

अन्न सार्वजनिक वितरण विभागाच्या नेतृत्वाखालील “अन्न चक्र” रेशन धान्य दुकानांना होणा-या मालाच्या पुरवठा साखळीमध्‍ये सुधारणा घडवून , देशभरामध्‍ये अन्नधान्याच्या वाहतुकीच्या जाळ्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे पोर्टल, एक महत्त्वाचा उपक्रम आहे. ‘जागतिक अन्‍न कार्यक्रम (डब्ल्यूएफपी) आणि फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर (एफटीआयआय), आयआयटी -दिल्ली यांच्या सहकार्याने हा प्रकल्प विकसित केला आहे. धान्य पुरवठा करण्‍यासाठी योग्य मार्ग ओळखून आणि पुरवठा साखळीत प्रत्येक ठिकाणी अन्नधान्याचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रकल्पामध्‍ये प्रगत ‘अल्गोरिदम’चा वापर केला आहे. या एकूण सर्व कामकाजामध्ये एक गुंतागुंतीची पुरवठा शृंखला समाविष्ट आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांपासून रास्त भाव दुकानांपर्यंत अनेक भागधारकांवर ही साखळी अवलंबून आहे. मात्र सर्व घटकांचा विचार करून देशातील ८१ कोटी लाभधारकांना अन्न सुरक्षा प्रदान केली जाणार आहे. यामुळे जगातील सर्वात मोठ्या अन्न सुरक्षा कार्यक्रमाला गती मिळणार असून कार्यक्षमता सुधारण्यास मदत मिळणार आहे. सुव्यवस्थित वितरण मार्गांद्वारे सुधारित कार्यक्षमता आणि खर्चात बचत करण्याबरोबरच इंधनाचा वापर, वेळ आणि वाहतुकीचा खर्च कमी होईल. वाहतुकीमुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि पर्यावरणीय फायदे मिळू शकणार आहेत.

रेशन दुकानात अनअन्नधान्य पुरवठा साखळीत सुधारणा करण्‍यासाठी आत्तापर्यंत ३० राज्यांचे मूल्यांकन केले गेले आहे. परिणाम अंदाजे खर्चात जवळपास २५० कोटी रुपयांची बचत होऊ शकणार आहे. दरवर्षी २५० कोटी क्‍यूकेएम (म्हणजे अन्नधान्य प्रति क्विंटल गुणिले अंतरामध्‍ये प्रतिकिलोमीटर यांचे प्रमाण) बचत व्‍हावी, या उद्दिष्टासाठी इतका मोठा प्रयत्न करण्‍यात आला आहे. या पुरवठा साखळीमध्‍ये ४.३७ लाख रास्त भाव दुकाने आणि सुमारे सार्वजनिक वितरण पुरवठा साखळीतील ६७०० गोदामे सामील करण्‍यात आली आहेत. आंतरराज्यांमध्‍ये वाहतूक केली जात असताना वाहतुकीचा खर्च विनाकारण वाढू नये, यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून मार्ग विकसित केला आहे. तसेच हे काम ‘युनिफाइड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म’ (यूएलआयपी) द्वारे रेल्वेच्या एफओआयएस (फ्रेट ऑपरेशन्स इन्फॉर्मेशन सिस्टम) पोर्टलबरोबर सुसंगत करण्‍यात आले आहे.

स्कॅन (सबसिडी क्लेम ॲप्लिकेशन फॉर एनएफएसए) पोर्टलद्वारे राज्यांचे अनुदान दावे एकल खिडकीव्दारे सादर करणे, त्या दाव्यांची छाननी आणि डीएफपीडीद्वारे मंजुरी, जलद तडजोड प्रक्रिया सुलभ करण्याची सुविधा प्रदान करेल. पोर्टल नियम-आधारित प्रक्रियेचा वापर करून अन्न अनुदान सोडण्यासाठी आणि सेटलमेंटसाठी सर्व प्रक्रियांचे ‘एंड-टू-एंड वर्कफ्लो ऑटोमेशन’ सुनिश्चित केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

३१ जिल्ह्यांतील ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्स बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणीसंदर्भात १०४ अर्ज प्राप्त

Next Post

पंतप्रधान आज करणार अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन…या क्षेत्रात आर्थिक संधींना मिळणार प्रोत्साहन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
modi 111

पंतप्रधान आज करणार अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन…या क्षेत्रात आर्थिक संधींना मिळणार प्रोत्साहन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011