नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी क्रिकेटपटू आणि पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1988 च्या रोड रेज प्रकरणी न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला. रोड रेज प्रकरणी शिक्षेत वाढ करण्याच्या नवज्योत सिंग सिद्धूच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाने नवज्योतसिंग सिद्धू यांना दोषमुक्त करण्याच्या मे 2018 च्या आदेशाचे पुनरावलोकन केले आहे. या आदेशानुसार सिद्धूला पंजाब पोलिस ताब्यात घेतील. आता आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत सिद्धूला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पतियाळा येथे 1988 मध्ये नवज्योत सिद्धू यांच्यात पार्किंगवरून भांडण झाले होते. ज्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. आता न्यायालयाने सिद्धू यांना १ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.