मुंबई – स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सणासुदीच्या काळात आपल्या क्रेडिट कार्डधारकांसाठी तीन दिवसांची मेगा शॉपिंग फेस्टिव्ह ऑफर 2021 ‘दमदार दस’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही ऑफर दि.3 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होईल. देशभरातील लाखो कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे.
पहिल्या प्रकारच्या ऑनलाइन शॉपिंग फेस्टिव्हल दरम्यान एसबीआय कार्ड रिटेल कार्ड धारकांना कोणत्याही घरगुती ई-कॉमर्स साइटवरून वस्तू खरेदी करण्याचे स्वातंत्र्य असेल. या कालावधीत खरेदीवर 10 टक्के कॅशबॅक मिळवण्यासाठी त्यांना फक्त एक किंवा दोन साइटपुरते मर्यादित राहण्याची गरज नाही. तसेच ईएमआय पेमेंटची वाढती लोकप्रियता पाहता, कंपनीने ऑनलाईन व्यापारी ईएमआय व्यवहारांवरही ही ऑफर जाहीर केली आहे.
एसबीआय कार्ड फेस्टिव्ह ऑफर 2021 बद्दल बोलताना, एसबीआय कार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राम मोहन राव अमारा म्हणाले की, जास्तीत जास्त कार्डधारक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून विविध श्रेणींमध्ये ऑनलाइन खरेदी करत आहेत. तसेच सणासुदीच्या काळात ही संख्या आणखी वाढते. आम्ही ग्राहकांच्या वाढत्या गरजांनुसार त्यांना साधे फायदे देण्याचे मार्ग शोधत आहोत.
या ऑफरद्वारे, आम्ही ग्राहकांना सोयीस्कर, सुलभ, सुसंगत आणि सुरक्षित पद्धतीने कधीही, कुठेही पेमेंट करण्याची सुविधा प्रदान करण्याचे ध्येय ठेवते आहे. भारतातील सर्व एसबीआय कार्ड ग्राहक 3 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या या एसबीआय कार्ड फेस्टिव्ह ऑफर 2021 चा लाभ घेऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.