नवी दिल्ली – स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील सर्वात मोठ्या बँकेचे तुम्ही ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बँकेने ग्राहकांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाचे दोन इशारे दिले आहेत.
पहिला इशारा
एसबीआयच्या ग्राहकांनी या महिन्याच्या अखेरपर्यंत आपला पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करण्यास सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया केली नाही तर ग्राहकांना बँकिंग सेवेचा लाभ घेताना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. एसबीआयने ट्विटमध्ये म्हटले की, असुविधा होऊ द्यायची नसेल तर आपल्या पॅनला आधारशी लिंक करा आणि अनिर्बंध बँकिंग सेवेचा आनंद घ्या. पॅनला आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. असे नाही झाले तर पॅन निष्क्रिय होईल, असे एसबीआयने म्हटले आहे.
दुसरा इशारा
१५ सप्टेंबरला रात्री १२ ते २ वाजेपर्यंत देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे एसबीआयची ऑनलाइन सेवा १२० मिनिटांपर्यंत ठप्प राहणार आहे, असे एसबीआयने दुसर्या ट्विटमध्ये सांगितले.