नवी दिल्ली – देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्यामुळे आता शक्यतो नागरिक घराबाहेर जाण्यास टाळत आहेत. त्यामुळे ग्राहक बँकेत जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आता बँक ग्राहकांना आपली सर्व कामे घरी बसून करता येतील.
आपल्याला बचत खाते उघडायचे असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सुविधा उपलब्ध करून देली आहे. आता आपण घरातून ऑनलाईन बचत खाते उघडू शकता. खाते उघडण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता नसते. ते त्वरित ऑनलाइन उघडता येते. म्हणजे आपण हे खाते पेपरलेस उघडू शकता.
एसबीआयचे ऑनलाईन बँक खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्ट फोनवर योनो अॅप डाउनलोड करण्याची आवश्यकता आहे. तसेच सदर खाते उघडण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड आणि आधार कार्डची आवश्यकता असेल.
एसबीआय इंस्टा सेव्हिंग्ज बँक खातेधारकांना रोज २४ तास आठवड्याचे ७ दिवस बँकिंग प्रवेश मिळतो. एसबीआय इन्स्टा सेव्हिंग बँक खात्यातील नवीन खातेदारांना वैयक्तिकपणे रुपे एटीएम कम डेबिट कार्ड देखील जारी करते.
योनो अॅपद्वारे खाते उघडण्याची प्रक्रिया अशी आहे…
१) एसबीआयमध्ये इंस्टा सेव्हिंग्ज बँक खाते उघडण्यासाठी ग्राहकांना योनो अॅप डाउनलोड करावा लागेल.
२) यानंतर आपला पॅन व आधार तपशील सादर करा आणि ओटीपी सबमिट करा व इतर तपशील भरा.
३) यानंतर तुम्हाला ओटीपी (वन टाईम पासवर्ड) जमा करावा लागेल. तसेच इतर काही तपशील भरावे लागतील.
४) एकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाते त्वरित सक्रिय होईल आणि त्यानंतर आपण ताबडतोब व्यवहार सुरू करू शकता.
५) ग्राहक पूर्ण केवायसी पूर्ण करण्यासाठी एका वर्षात जवळच्या बँक शाखेत भेट देऊ शकतात.