नवी दिल्ली – फुटीरतावादी नेते सय्यद शाह गिलानी यांच्या नातवाला सरकारने तडकाफडकी काढून टाकले आहे ,सय्यद शाह गिलानी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नातू अनीस-उल-इस्लाम यांना शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कार्यरत होता. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिल्याच्या कारणावरून सरकारने ही कारवाई केली आहे. त्यामुळे सरकार दहशतवादी कारवायांबाबत अतिशय आक्रमक असल्याचे दिसून येत आहे.
अनीस आणि त्याचा सहकारी अल्ताफ अहमद शाह याला घटनेच्या कलम 311 अंतर्गत विशेष तरतुदीचा वापर करून नोकरीवरून काढून टाकण्यात आले. 2016 मध्ये त्याची शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये संशोधन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. तीन वेळा आमदार असलेले सय्यद अली शाह गिलानी हे पाकिस्तानचे खुले समर्थक मानले जातात. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ फुटीरतावादी राजकारणाचे नेतृत्व केले होते. सय्यद शाह गिलानी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. आता त्यांच्या नातवावर कठोर कारवाई करुन सरकारने दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकविला आहे.