सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बागलाण तालु्क्यातील मुंजवाड येथे महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था संचलित जनता विद्यालयात तब्बल ११ हजार स्क्वेअर फूट एवढी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या प्रतिमेची रांगोळी साकारण्यात आली आहे. यासाठी २०५० किलो इतक्या रांगोळीचा वापर केला गेला. कला शिक्षक अहिरे दिगंबर व शाळेचे ३० विद्यार्थी, ८ शिक्षक, शिक्षिका सहभागी झाले. एकूण ३१ तासाच्या अथक परिश्रमातून हे शक्य झाल्याचे मुख्याध्यापक एस .आर. जाधव सर यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष गोकुळ सहादु जाधव सेक्रेटरी तुकाराम महादू सुर्यवंशी व संचालक मंडळ यांनी या विश्वविक्रम रांगोळीला शुभेच्छा दिल्या.
Savitribai Fule Jayanti 11000 Sqft Rangoli Video Record