नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इसवी सन १६३०, या काळातील स्वराज्याचे चलन असलेली ‘शिवराई’ तुम्हाला बघायची आहे ? मौर्य घराण्याच्या कालावधीत जी नाणी वापराता होती त्या मौर्य काळातल्या नाण्यांचा इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा आहे ? १९३६ साली तुम्ही पोस्ट खात्याच्या दाम दुप्पट योजनेसाठी जर पैसे गुंतवले असते, तर तुम्हाला कशा स्वरुपाची पावाती मिळाली असती हे जाणून दिलेली पावती कशी असते घ्यायचयं ? टपाल तिकिटावर श्वानाचे स्थान काय आहे, तुम्हाला जाणून घ्यायचे आहे….? किंवा तुम्हाला जुनी नाणी, जुन्या वस्तू खरेदी करण्याचा आनंद लुटायचा आहे… चला तर मग आजचा शेवटचा दिवस आहे ‘रेअर फेअर २०२३’ या प्रदर्शनाचा. ‘कलेक्टर्स सोसायटी ऑफ नुमीस मॅटिक अँड रेअर अॅटम्स’ नासिक या संस्थेतर्फे नाशिकच्या मुंबई नाक्याच्या पुढे असलेल्या मनोहर गार्डनमध्ये ६ जानेवारी पासून एक दुर्मिळ प्रदर्शन भरले असून आज म्हणजेच, ८ जानेवारी त्याचा शेवटचा दिवस आहे.
‘Save Heritage through hobbies’ हे ब्रीद साध्य करण्यासाठी कार्यरत असलेल्या नाशिकच्या या संस्थेतर्फे या दुर्मिळ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्याला नाशिककरांचा प्रतिसाद अतिशय मोठ्या प्रमाणावर लाभतो आहे. आत्तापर्यंत कुणाकुणाला भारतरत्न प्राप्त झाले?. कुणाकुणाला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार दिला गेला, स्वातंत्र्य पूर्वकाळात मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ? इथपासून तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात वापरली जाणारी शस्त्रास्त्र, दांडपट्टे आणि सुपारी फोडणारा अडकित्ता सुद्धा तुम्हाला या प्रदर्शनात बघायला मिळतो.
याखेरीज अतिशय दुर्मिळ अशी इतिहासकालीन नाणी तुम्हाला संग्रही ठेवायची तयारी असेल माहितीसह बघायला आणि अभ्यासायला मिळतात आणि त्याचबरोबर ज्या कोणाला अशी नाणी संग्रहासाठी विकत घ्यायची आहे त्याचीही सोय या संग्रहालयात बघायला मिळते. केवळ तांब्या पितळेचीच नव्हे तर सुवर्ण नाण्यांच्या दर्शनाचा लाभ देखील नाशिककरांना होतो आहे. रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ हा या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून, हे प्रदर्शन या दिवशी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.