नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच, विविध संस्था आणि संघटनांच्यावतीने मोर्चाही काढण्यात आला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांना मदत केली असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत केले. या वक्तव्याचे पडसाद विविध ठिकाणी पडत आहेत. सावरकर यांच्या जन्मस्थळी भगूर येथेही याचे पडसाद दिसले. भगूर बंदचे आवाहन सकाळीच करण्यात आले. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा आणि दुकाने बंद होती. या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. कडकडीत बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच, विविध संस्था आणि संघटनांच्यावतीने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करणारा मोर्चा काढण्यात आला. चौकामध्ये आंदोलकांनी निदर्शनेही केली.
Savarkar Birthplace Bhagur Agitation Bandh