मुंबई – प्रख्यात गायिका सावनी रविंद्रने सोशल मिडियाच्या माध्यमातून गोड बातमी शेअर केली आहे. पती आशिष धांडे समवेत तिने एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. त्याद्वारे तिने जाहिर केले आहे की त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. मी आणि आशिष आमच्या जिवनात एक गोड सदस्य सामील झाला आहे. आमच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. आयुष्य खुपच सुंदर आहे, असे तिने म्हटले आहे. सावनीने प्रेग्नंट असताना आशिषसह खास फोटोशूट करुन चाहत्यांना ही बातमी यापूर्वीच दिली होती. त्याला चाहत्यांचे खुप लाईक्स मिळाले होते.
सावनीने फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट अशी