नाशिक – सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या सन २०२२ -२०२७ या पंचवार्षिक निवडणुकीतील मतदानास पात्र सभासद मतदारांची प्रारूप मतदार यादी आज २ एप्रिल २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून सदर प्रारूप मतदार यादी सावानाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. तसेच सदरची यादी सावाना कार्यालयात, स्वा.सै.गो.ह.देशपांडे उद्यान वाचनालय, गंगापूर रोड शाखेत सभासद मतदारांना बघण्यासाठी उपलब्ध करण्यात आली असून, सदरची यादी सावानाचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांचे स्वाक्षरीने प्रसिध्द करण्यात आली आहे.
सावाना सभासदांनी सदर यादीचे अवलोकन करून कोणाच्या काही हरकती असल्यास त्या हरकती सदर यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून साप्ताहिक सुट्टी वगळता सात दिवसात म्हणजे ९ एप्रिल,२०२२ पावेतो सावानाच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सकाळी ११.०० ते रात्री ७.३०पावेतो) लेखी स्वरुपात आपल्या हरकती नोंदवाव्यात तसेच १० एप्रिल,२०२२ रोजी सकाळी ११.३० वा. सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर ११ एप्रिल,२०२२ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होईल. असे सावाना कार्यकारी मंडळाने कळविले आहे.