गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सावानाचे वस्तुसंग्रहालयातील विविध वस्तूंचे ज्ञानभांडार बघण्यास पहिल्या दिवशी गर्दी

by India Darpan
मे 25, 2022 | 7:31 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220525 WA0268

नाशिक– विविध वस्तूंचे ज्ञानभांडारच असलेले सार्वजनिक वाचनालयाचे वस्तुसंग्रहालय म्हणजे अनमोल खजिनाच असून ते आमजनतेला बघण्यासाठी कायमस्वरूपी खुले करावे,असे प्रतिपादन वास्तुकलेचे ज्येष्ठ संग्राहक लक्ष्मीकांत वर्मा यांनी केले. नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक वस्तुसंग्रहालय दिनाच्या निमित्ताने सावानाचे वास्तुसंग्रहालय बुधवारपासून चार दिवसांसाठी सर्व नाशिककर नागरिक तसेच सभासद यांचे करता विनाशुल्क खुले करण्यात आले असून त्याबाबत आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वर्मा बोलत होते.व्यासपीठावर इतिहासतज्ञ व ज्येष्ठ पत्रकार रमेश पडवळ,सावानाच्या वास्तुसंग्रहालय समितीच्या नवनिर्वाचित सचिव सौ.प्रेरणा बेळे,ग्रंथसचिव जयप्रकाश जातेगांवकर,सहसचिव अभिजित बगदे,अर्थसचिव देवदत्त जोशी,संजय करंजकर, गणेश बर्वे, मंगेश मालपाठक, सोमनाथ मुठाळ,निवृत्त न्यायमूर्ती वसंतराव पाटील,महेश शिरसाठ आदी होते. पहिल्याच दिवशी हे संग्रहालय बघण्यास नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.
IMG 20220525 WA0270या विभागात जुने ऐतिहासिक शस्त्रगार, काचचित्रे, गंजिफा, धातूच्या मूर्ती, नाणी, चित्रे, यांचा अनोखा ठेवा आपणास येथें बघावयास मिळतो. शिल्पकला, चित्रकला तसेच प्राचीन तत्कालीन इतिहासाचे नमुने असल्याने नाशिकककरांसाठी ती अभिमानास्पद बाब असल्याचेही वर्मा यांनी नमूद केले .सावाना म्हणजे माणसे घडविणारी फॅक्टरी आहे.सावनामुळेच जिल्ह्यातील पुरातन मंदिरे,गडकिल्लेबाबतची माहिती कळली आणि भटकंती करून अनेक मंदिरांचा व ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास केला.अनेक पुस्तके लिहिली. नाशकात अतिभव्य असे वस्तुसंग्रहालय उभे राहू शकते.त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची अनेक लोकांची तयारी आहे.सावानाने यासाठी पुढाकार घेतल्यास हे स्वप्न साकार होऊ शकेल,असे रमेश पडवळ आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले. वस्तुसंग्रहालय सचिव प्रेरणा बेळे यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनामागचा हेतू स्पष्ट केला.प्रदर्श २८ मेपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत विनामूल्य बघता येईल.लवकरच ते कायमस्वरूपी सर्वांसाठी खुले करण्याचा आमचा मानस आहे,असेही त्या पुढे म्हणाल्या.

या उपक्रमाचा आज पहिलाच दिवस असल्याने एक छोटेखानी स्वागत समारंभ आयोजित केला होता व त्याकरता पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात वाचनालयाचे सभासद व नाशिककर नागरिकांनी गर्दी केली होती व अतिशय उत्स्फूर्त अशी दाद देत त्यांनी हे वस्तुसंग्रहालय म्हणजे एक खूप मोठा ऐतिहासिक साठा आहे असे मनोगत व्यक्त केले. येणाऱ्या काळात हे वस्तुसंग्रहालय शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी तसेच नाशिकला येणाऱ्या सर्व पर्यटक सुद्धा या ठिकाणी कसे येतील यासाठी नियोजन करणार असल्याचे वस्तुसंग्रहालय सचिव सौ प्रेरणा बेळे यांनी नमूद केले. पाहुण्यांचा परिचय सहसचिव अभिजित बगदे व गणेश बर्वे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन अर्थ सचिव देवदत्त जोशी यांनी मानले

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगावमध्ये भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी मनसे नेते राज ठाकरे यांना दिला हा सल्ला (बघा व्हिडिओ)

Next Post

निष्काळजीपणा नडला! कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणे जीवावर बेतले; तरुणीचा जागीच मृत्यू

India Darpan

Next Post
railway line e1657722545955

निष्काळजीपणा नडला! कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणे जीवावर बेतले; तरुणीचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011