नाशिक – सार्वजनिक वाचनालयाचे परशुराम सायिखेडकर नाट्यमंदिर कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर खुले होणार आहे. त्यासाठी सर्व रंगकर्मी प.सा. नाट्यगृहात एकत्रित येऊन नाट्यगृह खुले होण्याचा आनंद व्यक्त केला. ज्येष्ठ अभिनेते दीपक करंजीकर व सौ. विद्या करंजीकर यांच्या शुभहस्ते रंगमंच व नटराज पूजन करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी सुनिल देशपांडे यांनी नांदी सादर केली तर विवेक गरुड यांनी स्वरचित कवितेचे वाचन केले, मोहन उपासनी यांनी बासरीचे सुमधुर असे सूर नाट्यमंदिरात बऱ्याच काळानंतर रंगकर्मीना ऐकायला मिळाले, तसेच कोकण येथील रत्नागिरीची सुहानी अंकुश नाईक हिने पु.ल.देशपांडे यांच्या कोकणातील प्रवासबद्दल गमंती जमंती सांगितल्या आणि कुसुमाग्रज यांची कणा कविता सादर केली. कार्यक्रमाचे स्वागत, सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन ज्येष्ठ रंगकर्मी ईश्वर जगताप यांनी केले. यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर, आनंद ढाकीफळे, माधुरी कुलकर्णी, रवी साळवे, रविंद्र ढवळे, दीप्ती भालेराव, आदिती मोराणकर, लक्ष्मी पिंपळे, पल्लवी ओढेकर, राजा पाटेकर, स्वप्नील तोरणे,विशाल जातेगांवकर, नंदकुमार देशपांडे, सागर कोरडे, नेहा निमगावकर, भूषण भावसार, विक्रम गावंदे, अमेय कुलकर्णी, मोहिनी भगरे, प्रिया सुरते, ऋषिकेश रोटे, अभिजित पाठक, सई मोराणकर, हरिकृष्ण डीडवाणी, रविंद्र जन्नावार, चैतन्य गायधनी तसेच सावाना सेवकवृंद आदी उपस्थित होते.