गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सौर कृषी वाहिनी योजनेमुळे कृषीपंपांना मिळणार दिवसा वीज….नाशिक जिल्हाधिकारी यांनी केली प्रकल्पाची पाहणी

by India Darpan
मार्च 27, 2025 | 8:10 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250327 WA0229 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनासाठी आणलेल्या सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवस वीज पुरवठा मिळत असून, ही जगातील सर्वात मोठी विकेंद्रीत सौर निर्मिती योजना असून आगामी काळात यामुळे राज्यासह जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिरूर तांगडी येथील ६ मेगावॅटच्या सौर प्रकल्पास नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यासह नाशिक जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून शिरूर तांगडी येथील ६ मेगावॅटच्या या प्रकल्पातून सद्यस्थितीत ५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती होत आहे. या प्रकल्पामुळे या भागातील २ हजार ४६० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे.

चांदवड तालुक्यातील शिरूर तांगडी येथील सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर हा सौर प्रकल्प उभारण्यात आला असून विजेची निर्मिती सुरू झाली आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थ व सरपंच यांचा पुढाकार पाहून जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले तसेच इतर ग्रामपंचायती व सरपंचांनी याचा आदर्श घेऊन सौर प्रकल्प निर्मितीस जागा देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होण्यासोबत स्वस्तात वीज उपलब्ध झाल्याने उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्याची संधी भविष्यात मिळणार आहे. या योजनेमुळे कृषी क्षेत्राला मोलाची मदत करण्यासोबतच उद्योगांनाही प्रोत्साहन मिळणार असल्याचे प्रतिपादन अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी यावेळी केले.

याप्रसंगी महावितरणच्या नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार मंदार कुलकर्णी, चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश चालीकवार टोरन्ट पॉवरचे प्रतिनिधी, शिरूर तांगडीच्या सरपंच पूनम अमोल जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहरासाठी १ हजार गुलाबी ई-रिक्षा….महिलांनी असा करावा अर्ज

Next Post

जिओने दाखल केले ४ हजारहून अधिक पेटंट, भारत सरकार कडून ‘राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार

Next Post
IMG 20250327 WA0258

जिओने दाखल केले ४ हजारहून अधिक पेटंट, भारत सरकार कडून ‘राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011