नाशिक (इंडिया दर्पण वृ्त्तसेवा) – पुणे येथे होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेच्या ( एमसीए सिनियर इन्विटेशन लीग), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, नाशिकने ॲम्बिशिअस विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले.
नाशिकचा रणजीपटू कर्णधार सत्यजित बच्छावने डावात ९ बळी घेत अफलातून कामगिरी केली. तर फलंदाजीत मुस्तानसिर कांचवाला ९० व यासर शेख ८५ धावा यांनी प्रभावी कामगिरी केली.
पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी मिळालेल्या ॲम्बिशिअसला सत्यजित बच्छावने डावात ९ बळी घेत ६९.३ षटकांत २६५ धावांत सर्वबाद केले. २२.३-१०-६७-९. रोहित हडकेने सर्वाधिक ८८ धावा केल्या. उत्तरादाखल नाशिकने मुस्तानसिर कांचवाला ९० , यासर शेख ८५ व कुणाल कोठावदेच्या ४६ धावांच्या जोरावर सामना संपेपर्यंत ८० षटकांत ५ बाद ३१७ धावा करत पहिल्या डावातील आघाडीचे महत्वपूर्ण गुण मिळवले.