शनिवार, ऑक्टोबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लवकरच उलगडणार ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नावामागचं रहस्य; १ तासाचा विशेष एपिसोड

फेब्रुवारी 10, 2023 | 6:38 pm
in मनोरंजन
0
Satvya Mulichi

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात लोकप्रिय असतात. घरोघरी दिवसातील काही काळ खास त्यासाठी राखून ठेवलेला असतो. यातही ‘झी मराठी’ वाहिनी पूर्वीपासून दर्जेदार मालिकांसाठी ओळखली जाते. सध्या या वाहिनीवर सुरू असलेली ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. वेगळे कथानक, वेगळा विषय यामुळेच प्रेक्षकांचा याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पण मालिकेतील नेत्राला तिच्या विशेष शक्तीमुळे सगळ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. यासोबतच या मालिकेच्या नावाबाबतही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आहे. प्रेक्षकांच्या या प्रश्नाचं लवकरच उत्तर मिळणार आहे. नेत्राला ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ असं का म्हटलं जातं आणि या नावामागचं रहस्य काय आहे हे प्रेक्षकांना येत्या रविवारी, १२ फेब्रुवारीला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे.

https://twitter.com/zeemarathi/status/1623548520090443777?s=20&t=uAlISpWbirkR14gliLt6uQ

मालिकेचा रोजचा ट्रॅक हा उत्कंठा वाढवणारा आहे. राजाध्यक्षांच्या घरातील अनेक गोष्टींना रुपाली जबाबदार असल्याचे प्रेक्षकांना नेत्राच्या नजरेतून समजले आहेच. यासोबतच ममताच्या मृत्यूला जबाबदार कोण, त्रिनयना देवीच्या मंदिरातील रहस्य असलेला ग्रंथ कोणी चोरला आणि राजाध्यक्ष कुटुंबातील जीवघेण्या कारस्थानामध्ये कोणाचा हात आहे, हे देखील प्रेक्षकांना लक्षात आलं आहे. मात्र, नेत्राला हे सत्य तिच्या दिव्यशक्तीने कळलेलं असल्याने तिला इतरांना हे सांगताना सिद्ध करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. रुपालीने ग्रंथातील रहस्य समजावून घ्यायला सुरुवात केल्यापासून तिच्या मार्गात अनेक अडथळे येत आहेत. तर दुसरीकडे नेत्रा अद्वैतच्या मनातील ममताबद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अद्वैतसुद्धा नेत्राने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेऊन ममताच्या बाबतीत पुन्हा एकदा विचार करायचं ठरवतो.

ग्रंथ वाचण्यासाठी रुपाली हेमाची मदत घेते. त्यातूनच नेत्राला हरवणं सोपं नाही, हे रुपालीला कळतं. तिच्याकडे असलेल्या दिव्यशक्तीमुळे ती आपला प्रत्येक डाव उधळून लावणार असल्याचेही तिच्या लक्षात येत. नेत्राची देवीवर गाढ श्रद्धा आणि विश्वास आहे. ग्रंथात लिहिलेल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या ओळींपर्यंत रुपालीला अर्थ कळतो आणि या ओळीच्या पुढे लिहिलेलं रहस्य कळल्यावर रुपालीला आपली हार स्पष्ट दिसते. नेत्राची आई ही सातवी मुलगी आणि नेत्रा तिची सातवी मुलगी हा या मालिकेच्या नावामागचा एक अर्थ प्रेक्षकांना माहित आहे. परंतु या नावामागचं रहस्य येत्या रविवारी १२ फेब्रुवारी रोजी महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

https://twitter.com/zeemarathi/status/1623288865065934848?s=20&t=uAlISpWbirkR14gliLt6uQ

Satvya Mulichi Satvi Mulgi TV Serial Special Episode

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केला हार्वर्ड विद्यापीठासह या संस्थांशी करार; वैद्यकीय क्षेत्राला असा होणार फायदा

Next Post

खासदार रजनी पाटील यांचे निलंबन; संसदीय अधिवेशनात सहभाग घेता येणार नाही

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा धनत्रयोदशीचा दिवस… जाणून घ्या, शनिवार, १८ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 17, 2025
dhantrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे धनत्रयोदशी (धनतेरस) – अशी करा पुजा

ऑक्टोबर 17, 2025
dhanatrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीला या वस्तू चुकूनही खरेदी करू नका

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
Rajani Patil

खासदार रजनी पाटील यांचे निलंबन; संसदीय अधिवेशनात सहभाग घेता येणार नाही

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011