विशेष प्रतिनिधी, नाशिक
राज्य सरकारच्या निर्देशांनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात अनलॉकचे आदेश जाहिर झाले आहेत. यापुढील काळात काय सुरू राहिल आणि कशावर बंदी असेल याचे विस्तृत निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. याच निर्देशांमध्ये लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत लग्न समारंभ पूर्णपणे बंद आहेत. केवळ नोंदणी विवाहालाच संमती आहे. मात्र, सोमवारपासून लग्नसराई सुरू होणार असल्याने नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, नव्या निर्देशांनुसार केवळ सोमवार ते शुक्रवारच विवाह समारंभांना परवानगी आहे. त्यासाठीही स्थानिक पोलिस स्टेशनची परवानगी बंधनकारक आहे. लग्न समारंभांसाठी ५० जणांच्या उपस्थितीलाच मुभा देण्यात आली आहे. याचे उल्लंघन झाल्यास संबधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मात्र, या नव्या आदेशाने मोठाच संभ्रम तयार झाला आहे. सर्वसाधारणपणे मुहुर्तानुसारच लग्नसमारंभ केले जातात. आणि नव्या आदेशात केवळ सोमवार ते शुक्रवारच लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली आहे. म्हणजे, शनिवार आणि रविवार लग्न समारंभांना बंदी आहे. आणि विवाह मुहुर्त जर शनिवार आणि रविवारचा असेल तर त्यांनी काय करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापुढील काळातील विवाह मुहुर्त असे
जून
३, ४, १६, १९ (शनिवार) , २० (रविवार), २२, २३, २४
जुलै
१, २, ७, १३, १५
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तीन महिन्यात विवाह मुहूर्त नाहीत.
नोव्हेंबर
१५, १६, २०, २१, २८, २९, ३० नोव्हेंबर
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असे