नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर येथील महादेव नगर परिसरात राहणाऱ्या पप्पू वाघ (४०) यांचा गळा नायलॅान मांजाने कापल्यामुळे त्यांच्या गळ्याला सहा टाके पडले आहे. रविवारी सातपूर गावातून गाडीवरून जात असताना नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने ही घटना घडली. नायलॉन मांजाला बंदी असतांना सुध्दा त्याचा स-हास वापर केला जात आहे. या मांजाच्या वापर व विक्री करणा-याविरुध्द प्रशासनाने विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याची मागणी आता होत आहे. सातपूर परिसरातही या मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.