सातपूर – नववर्ष स्वागत यात्रा समिती, सातपूर यांच्या वतीने ३० फुट महारांगोळी, महागुढी, महाध्वज,महावादन, भजनी मंडळ यांचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर सातपूर येथील रांगोळी कलाकार स्नेहा नेरकर यांनी काढलेली महारांगोळी विशेष आकर्षण ठरली. महारांगोळी साठी २००किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. रांगोळी साठी ४ तासांचा कालावधी लागला. स्नेहा नेरकर यांना सातपूर येथील महिलांचे, ऊर्जेय योग केंदाचे महिलांचे विशेष सहकार्य लाभले. स्नेहा नेरकर यांनी नववर्ष स्वागत यात्रा समितीचे सदस्य, डॉ. श्रीराज वाणी, डॉ. मेघा वाणी, अभय नेरकर, लोकेश कटारिया, तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.