नाशिक – एमआयडीसीतील ललित हायड्रोलिक्स या कंपनीत अचानक स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत सहा कामगार भाजल्याची घटना घडली आहे.सायंकाळी साडेपाच सुमारास स्फोट झाल्याचे बोलले जात आहे. हा स्फोट इतका भीषण होता की कंपनीतून आगीचे लोळ बाहेर येत होते. दरम्यान, महापालिकेच्या आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबांनी घटनास्थळी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या घटनेत अद्याप जखमींची नावे समजू शकलेली नाहीत. जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात येत आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत प्लॅाट नंबर डी ७१ मधील ललित हॅाड्रोलिक कंपनी आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कंपनीत टेस्टिंग करत असतांना नायट्रोजन गॅसचा स्फोट झाला. या कंपनीत विविध प्रकारचे हायड्रोलिक्सचे उत्पादन केले जाते. कोरोना नंतर कंपनीत ऑर्डर पूर्ण करण्याचे काम सुरु होते. या ठिकाणी कामगारांची संख्या सुध्दा कमी होती. शनिवार सुट्टी असतांना एका उत्पादनाची टेस्टिंगचे काम सकाळ पासून सुरु होते. यावेळी अकरा कामगार कामावर होते. याचवेळी अचानक स्फोट झाला या स्फोटाची तिव्रता इतकी मोठी की कंपनीचे छतावरील सर्व पत्रे उडाले. यात अकरा पैकी सहा कामगार जखमी झाले.