सातपूर : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ५० जणांवर सातपूर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांची अॅटीजन टेस्ट करण्यात आली. यात चार जण पॉझिटीव्ह आले असून त्यांना ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.
सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत अशोक नगर चौकात पोलिस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) विजय खरात, सहा. पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड १९ चे उल्लंघन करणाऱ्या, विना मास्क,विनाकारण सार्वजनिक रस्त्यावर फिरणाऱ्या इसमानवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यासाठी मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्याकडून एकत्रित पणे कारवाई करण्यात आली. त्यात ५० इसमांची अशोक नगर चौकात अॅटीजन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ४ इसम पॉझिटिव्ह मिळाल्याने त्यांना ठक्कर डोम येथे पाठविण्यात आले. अशीच कारवाई सातपूर परिसरात नियमितपणे चालू राहणार आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर फिरू नये, कोरोनाची ब्रेक द चेन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले.