नाशिक – गेल्या चार दिवसात शहरामध्ये तब्बल तिसरा खुन झाला आहे. हत्यांच्या या सत्रामुळे नाशिक हादरले आहे. आज सकाळी झालेल्या सातपूर येथील हत्याकांडाचा छडा नाशिक पोलिसांनी लावला आहे. सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या झाली. गळा चिरुन त्यांची हत्या करण्यात आली. आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा खुन राजकीय नसून युनियनच्या वादातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. बघा पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/420543436317093/