नाशिक – शहरात सध्या वेगवेगळ्या भागात साप आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सातपूर भागात सात फुटी धामण पकडण्यात सर्पमित्रांना यश आले आहे. सोमेश्वर कॉलनी परिसरात दोन वेगवेगळ्या भागात २ धामण आणि १ अति विषारी घोणस जातीचा साप आढळून आला. सर्पमित्र तुषार गोसावी यांनी मोठ्या शिताफीने या सापांना पकडले. त्यानंतर या सापांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे.
वातावरणातील बदल आणि हिवाळ्यात सापांचा मिलन काळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात साप हे बिळाबाहेर येत असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. सापांना मारण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
सिडकोतील माऊली लॉन्स परिसरातील साई पेट्रोल पंपाजवळ भिंतीवर सात फुटाची धामण असल्याचे स्थानिक नागरिकांना लक्षात आले. त्यांनी तातडीने सर्पमित्र तुषार गोसावी यांना पाचारण केले. गोसावी यांनी मोठ्या हिंमतीने झाडावरून थेट प्लॉटमध्ये उतरले. त्यानंतर झुडपात गेलेल्या ७ फुटी धामणला पकडले. बघा हा थरारक व्हिडिओ
https://www.facebook.com/103446941470343/posts/375368527611515/
फोटो आणि व्हिडिओ सौजन्य – राजेंद्र भांड