साप्ताहिक राशिभविष्य – ११ ते १८ एप्रिल २०२१
१) मेष- छोट्या छोट्या गोष्टी मध्ये वाद टाळा. भावनिक मूल्यांकन गरजेचे. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनपेक्षित वस्तू लाभ.
२) वृषभ – चर्चेतून समस्यांचा मार्ग काढा. धार्मिक कार्य संभवते. कौटुंबिक मनस्वास्थ्य सांभाळा. अनपेक्षित शुभवार्ता कळेल.
३) मिथुन- वाद होईल अशा विषयावर चर्चा टाळावी. अडचणींवर संयमाने मात करावी. दूरचा प्रवास टाळा.
४) कर्क – मोठा आर्थिक निर्णय टाळा. ज्येष्ठांची प्रकृती सांभाळा. व्यापार बदल टाळा. जुनाट आजार सांभाळा.
५) सिंह – व्यापारात अनपेक्षित लाभ. योग व प्राणायाम यावर भर द्या. विचार सकारात्मक ठेवा. मौखिक आरोग्य सांभाळा.
६) कन्या – करारमदार सांभाळा. नवे परिचय संभाळून करा. सामंजस्याने फायदा होईल. वाद-विवाद यापेक्षा मधला मार्ग स्वीकारा.
७) तूळ – मानसन्मान मिळेल. अति परिश्रम टाळा. प्रकृतीबाबत सावध रहा. छोट्या-मोठ्या समस्या युक्तीने सोडवा.
८) वृश्चिक – व्यवसाय वाढीबाबत दक्षता बाळगावी. संधीचा सदुपयोग करावा. मोसमी आजार सांभाळा.
९) धनु – व्यस्त वेळापत्रक राहील. अहंकार टाळा. मनाजोगे यश मिळेल. भागीदारी व्यवसाय सांभाळा.
१०) मकर – उत्पन्नाचे अन्य स्त्रोत तयार करा. तडजोड स्वीकारा. हितशत्रू बाबत दक्षता ठेवा. सामाजिक संबंधाबाबत काळजी घ्या.
११) कुंभ – गैरसमज टाळावे. आर्थिक निर्णय घाई नको. प्रकृतीची काळजी घ्या. ताणतणाव टाळा.
१२) मीन – खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळा. तुटेपर्यंत ताणू नका. एकाचवेळी विविध आर्थिक पर्यायांवर विचार करू नये.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे..