नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख यांना हुरुन इंडिया( Hurun India) द्वारे भारतातील सर्वात प्रतिष्ठित उद्योजकांपैकी एक म्हणून गौरवण्यात आले.
अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख यांना हुरुन इंडिया( Hurun India) द्वारे भारतातील सर्वात प्रतिष्ठित उद्योजकांपैकी एक म्हणून गौरवण्यात आले आहे. हुरुन (Hurun) एक अग्रगण्य संशोधन, लक्झरी प्रकाशन आणि कार्यक्रम गट आहे. १९९९ मध्ये लंडनमध्ये स्थापना झाली. हुरुन भारत, चीन, फ्रान्स, यूके, यूएसए, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा आणि लक्झेंबर्गमध्ये सक्रिय आहे.
सतीश पारख १९८२ मध्ये अशोकामध्ये ज्युनिअर इंजिनियर रुजू झाले होते. आज ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये आणि देशांमध्ये कंपनीच्या विस्ताराचे यशस्वी नेतृत्व केले आहे आणि कंपनीला देशातील आघाडीच्या पायाभूत विकासकांपैकी एक म्हणून स्थान दिले आहे.